Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर

कॅन्सरमध्ये शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि इतर अवयवांवर परिणाम करतात. हा आजार शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो आणि हळूहळू पसरतो. वेळेत निदान न झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.

early signs of cancer | saam tv

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

सुरुवातीची लक्षणं साध्या आजारांसारखी वाटतात त्यामुळे लोक दुर्लक्ष करतात. ही लक्षणं शरीरातील गंभीर बदलांचे संकेत असू शकतात. वेळेत तपासणी न झाल्यास आजार वाढण्याचा धोका असतो.

unexplained weight loss | saam tv

वेदनारहित गाठ

शरीरात अचानक दिसणारी वेदनारहित गाठ कॅन्सरचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. ती स्तन, मान, बगल किंवा अंडकोषात दिसू शकते. अशी सूज दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

persistent cough cancer | saam tv

न भरून येणारी जखम

तोंड किंवा शरीरावरील जखम 2 आठवड्यांपेक्षा जास्त न भरल्यास ती धोकादायक असू शकते. तोंडातील अल्सर हे मुखाच्या कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. अशी जखम दुर्लक्षित न करता त्वरित तपासणी करावी.

lump in body cancer | saam tv

रक्तस्त्राव होणं

कारण नसताना तोंड, लघवी, मल किंवा योनीतून रक्त येणं हे गंभीर लक्षण आहे. हे फुफ्फुस, गर्भाशय किंवा इतर कॅन्सरशी संबंधित असू शकते. अगदी कमी रक्तस्त्रावही दुर्लक्षित करू नये.

fatigue and cancer | saam tv

सतत खोकला

दीर्घकाळ खोकला किंवा आवाजात बदल हे गंभीर लक्षण असू शकतं. हे फुफ्फुस किंवा घशाच्या कॅन्सरचे संकेत देतात. लक्षणं 2–3 आठवडे टिकल्यास तपासणी आवश्यक आहे.

lung cancer signs | saam tv

वजन कमी होणं आणि थकवा

कारण नसताना वजन कमी होणे हे धोकादायक लक्षण मानलं जातं. सतत थकवा जाणवणं हेही कॅन्सरचे संकेत असू शकतात. विश्रांतीनंतरही सुधारणा न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

cancer detection early | saam tv

High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास पायांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

Poor Blood Circulation | saam tv
येथे क्लिक करा