चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

Sakshi Sunil Jadhav

अंबाडीच्या पानांच्या पातोड्या

रोजची पोळी भाजी खाऊन कंटाळला असाल तर अंबाडीच्या पानांच्या पातोड्या नक्कीच ट्राय करा. ही रेसिपी बनवायला सोपी आणि पौष्टिक आहे.

Ambadi Leaves Patodi

साहित्य

दहा ते बारा अंबाडीची मोठी पानं, २ कप बेसन, १ चमचा तांदळाचं पीठ, १ चमचा धणे जिरे पूड, १ चमचा तीळ, हिंग, १ चमचा गूळ, मोहरी जिरं, कढीपत्ता, मीठ, तेल इ.

Maharashtrian Patodi Recipe

स्टेप १

सर्वप्रथम अंबाडीची पानं तयार करून घ्या. त्यासाठी अंबाडीची पानं स्वच्छ धुवून पुसून कोरडी करा.

Ambadi Leaves Snack

स्टेप २

आता पीठाचं मिश्रण तयार करा. त्यासाठी बेसन, तांदळाचं पीठ, मसाला, हळद, हिंग गूळ आणि मीठ मिक्स करून हळूहळू पाणी घालून सरसरीत मिश्रण करा.

Ambadi Leaves Snack

स्टेप ३

एका पानावर मिश्रण पसरून त्यावर दुसरं पान ठेवा. अशाप्रकारे ४ ते ५ पानांचा थर लावून घट्ट गुंडाळी तयार करा.

Ambadi Leaves Snack

स्टेप ४

आता गुंडाळी वाफेवर २० ते २५ मिनिटं शिजवून घ्या. शिजल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यात.

Ambadi Leaves Snack

स्टेप ५

थंड झालेली गुंडाळी गोल आकारात कापून किंवा आवडीच्या आकारात कापून पातोड्यांचे तुकडे तयार करा.

Ambadi Leaves Snack

स्टेप ६

कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, तीळ आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. त्यामध्ये पातोड्यांचे काप घालून हलके परतून घ्या. गरमागरम अंबाडीच्या पातोळ्या सर्व्ह करा.

Ambadi Leaves Snack

NEXT: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

walking for blood pressure
येथे क्लिक करा