Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये हाय ब्लड प्रेशरच्या समस्या वाढतायेत. बऱ्याचदा कोणतीच ठळक लक्षणं यामध्ये दिसत नाही. यालाच सायलेंट किलर म्हणतात.
रोजच्या रोज चालल्याने रक्ताभिसरण सुधारतं, तुमचं ह्रदय निरोगी राहतं आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं.
तज्ज्ञांच्या मते, प्रौढांनी आठवड्यातून किमान 5 दिवस दररोज 30 मिनिटं वेगात चाललं पाहिजे. त्यामुळे आठवड्याला सुमारे 150 मिनिटांचा व्यायाम पूर्ण होतो.
रक्तदाब नियंत्रणासाठी चालण्याचा वेग महत्त्वाचा असला तरी रोजच्या रोज चालण्याची सवय जास्त फायदेशीर ठरते.
इतक्या वेगाने चालणे की ह्रदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास थोडा वाढतो. पण चालताना सहज बोलता येतं.
जर सलग 30 मिनिटं चालणं शक्य नसेल तर दिवसातून 10 ते 15 मिनिटांचं दोन किंवा तीन भागांमध्ये चालता येतं.
रोजच्या रोज केलेले कमी कमी वेळेचे चालण्याचे भाग सुद्धा ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी तितकेच प्रभावी ठरू शकतात.
ज्यांना आधीपासून हाय बीपीची समस्या आहे, त्यांनी रोज चालण्याची सवय लावल्यावर ब्लड प्रेशर कमी होतो.
वरील माहिती सामान्य जागरूकतेसाठी आहे. रक्तदाबासंबंधित कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार किंवा जीवनशैलीत बदल करावेत. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.