Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Saam Tv

पुरुषांच्या समस्या

पुरुषांच्या लघवीतून रक्त येत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामागे अनेक कारण आणि आजार असू शकतात.पुढील माहितीत आपण याबद्दल जाणून घेऊयात.

hematuria in men

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यामुळे लघवीतून रक्त येण्याची समस्या जाणवते. यासोबत सतत लघवीला लागणं, जळजळ आणि वेदना होऊ शकतात.

causes of blood in urine

जास्त व्यायाम करणं

बऱ्याच पुरुषांना जीमला जायची सवय असते. पण तिथे जास्त प्रमाणात व्यायाम केल्याने पुरुषांना लघवीतून रक्त येण्याची समस्या जाणवू शकते. याला एक्सरसाइज - इंड्यूस्ड हेमॅच्युरिया म्हणतात.

blood in urine reasons

किडनी स्टोनचा त्रास

किडनीत किंवा पुरुषांच्या मुत्राशयात खडा असेल तर लघवीतून रक्त येऊ शकतं. कंबरदुखी, पोटदुखी आणि मळमळच्या समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं.

bladder stone symptoms

प्रोस्टेट ग्रंथी वाढणे

वय वाढल्यानंतर प्रोस्टेटचा आकार वाढू शकतो. त्यामुळे लघवीत अडथळा येऊ शकतो आणि रक्त येण्याची समस्या वाढते.

urinary bleeding causes

किडनीचं नुकसान होणे

अपघात किंवा इतर कारणांमुळे किडनीला जखम किंवा दुखापत झाली असेल तर लघवीतून रक्त येतं आणि खूप वेदनाही होतात.

warning signs of prostate cancer

प्रोस्टेट कॅन्सर

लघवीत रक्त येणं हे प्रोस्टेट कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असतं.त्यासोबत वजन कमी होणं आणि खालच्या भागात वेदना जाणवतात.

warning signs of prostate cancer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

warning signs of prostate cancer

NEXT: BP च्या गोळ्यांमुळे किडनी खराब होते का? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली खरी माहिती

Blood Pressure Medicine | google
येथे क्लिक करा