International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

Shreya Maskar

योग दिवस

१२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस रविवार २१ जून २०२६ रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमित योगा करा.

Yoga Day | pinterest

जेवण

जेवणानंतर लगेच योगा करू नका. किमान २ ते ३ तास ​​थांबणे महत्त्वाचे आहे. योगा केल्यावर किंवा करण्यापूर्वी कोणताही कठीण व्यायाम करू नका.

Meals | pinterest

गरम पाण्याने आंघोळ

गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या शरीरातील अवयवांमधून रक्त त्वचेच्या पृष्ठभागाकडे खेचले जाते. यामुळे शरीरातील आवश्यक ऊर्जा कमी होते. योगाच्या किमान २ तास आधी किंवा नंतर आंघोळ करा.

Hot Bath | yandex

अति पाणी पिणे टाळा

शरीरात पाण्याची पातळी योग्य राखणे आवश्यक असले तरी शारीरिक हालचाली पूर्वी जास्त पाणी प्यायल्यास तुम्हाला सुस्त आणि अस्वस्थ वाटेल. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

Avoid drinking excessive water | pinterest

वॉर्म-अप न करणे

योगा सुरू करण्यापूर्वी वॉर्म-अप केला नाही तर थंड स्नायूंवर ताण येऊ शकतो आणि दुखापतीचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो. सांध्यांना लवचिक बनवण्यासाठी नेहमी सौम्य स्ट्रेच, मान फिरवणे किंवा सूर्यनमस्काराने सुरुवात करा.

warm-up | pinterest

दुखापत झाली असेल तर...

तुम्हाला कोणत्याही प्रकारची दुखापत, मुरगळणे, फ्रॅक्चर किंवा शस्त्रक्रिया झाली असेल, तर डॉक्टरांची परवानगी घेऊनच योगा करा. उत्साहात अति प्रमाणात योगा करू नये.

injury | pinterest

योग्य जागा

अत्यंत उष्णता, थंडी किंवा दमट वातावरणात योगा करू नये. यामुळे लक्ष केंद्रित होणार नाही आणि शरीराला आणखी त्रास होईल.

Location | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : मधुमेहाच्या रुग्णांचेही झटपट वजन होईल कमी, फक्त फॉलो करा 'या' ५ सीक्रेट टिप्स

Diabetes-Weight Loss | saam tv
येथे क्लिक करा...