Shreya Maskar
मधुमेहामुळे वजन वाढते, याचे मुख्य कारण म्हणजे इन्सुलिनची पातळी वाढणे. हे शरीरात इन्सुलिन प्रतिरोधकतेवर मात करण्यासाठी इन्सुलिनचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे आणि इन्सुलिनची औषधे घेतल्यामुळे होते.
संतुलित पोषणावर लक्ष केंद्रित करा. आहारात स्टार्च नसलेल्या भाज्यांचा समावेश करा. उदा. पालेभाज्या, ब्रोकोली तसेच आहारात लीन प्रोटीन घ्या. उदा. चिकन, मासे
प्रत्येक दिवशी हलका व्यायाम करा. नियमित व्यायामामुळे रक्तातील साखर कमी होते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. आठवड्यातून ३-४ दिवस ३० मिनिटे सायकलिंग करा. तसेच नियमित १५-२० मिनिटे चाला.
जेवण चुकवल्याने किंवा क्रॅश डायटिंग केल्याने तुमच्या रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होतात, जे आरोग्यास धोकादायक असतात. त्यामुळे नियमित जेवणाच्या वेळा पाळा. यामुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते.
सोडा, फळांचे रस आणि गोड चहा यांसारख्या कॅलरीजयुक्त पदार्थांमुळे रक्तातील साखरेत तीव्र वाढ होऊ शकते. कॅलरीचे सेवन कमी करण्यासाठी पदार्थांऐवजी पाणी, साखर नसलेला चहा प्या.
तुमचे वजन कमी झाल्यावर, तुमच्या शरीराची इन्सुलिनची गरज बदलेल. हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखरेची कमी पातळी) टाळण्यासाठी तुमच्या रक्तातील साखरेवर नियमितपणे लक्ष ठेवा. डायबिटीज तपासा आणि डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा.
सर्व कर्बोदके सारखी नसतात. प्रक्रिया केलेली साखर आणि प्रक्रिया केलेले पीठ यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. यांच्याऐवजी धान्ये , कडधान्ये आणि भाज्यांवर भर द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.