Subhedar Collection Saam TV
मनोरंजन बातम्या

Subhedar Day 3 Collection: 'सुभेदार' मोडणार का 'बाईपण भारी देवा'चा रेकॉर्ड? 3 दिवसात चित्रपटाची कोट्यवधींची कमाई

Subhedar Box Office Collection: पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे.

Pooja Dange

Subhedar Box Office Collection Day 3:

दिग्पाल लांजेकर यांच्या शिवअष्टकातील फर्जंद, फस्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेरशिवराज या चित्रपटांना महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. नुकताच या शिवअष्टकातील पाचवा चित्रपट 'सुभेदार' प्रदर्शित झाला आहे.

२५ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्र आणि स्वराज्यातील मावळा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'सुभेदार' आपल्या भेटीला आला. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे. अवघ्या तीन दिवसात चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे.

'सुभेदार' कलेक्शन

दिग्पाल लांजेकर यांनी शिवअष्टकातील पाचवे पुष्प 'सुभेदार' दरवळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवली नाही. विविध मार्गांनी केलेलं प्रमोशन, माऊथ पब्लिसिटी आणि शिवअष्टकावरील प्रेक्षकांचे प्रेम यामुळे चित्रपट यशाची पायरी चढत आहे.

चित्रपट समीक्षक आणि बिजनेस अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करत चित्रपटाचे कलेक्शन जाहीर केले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चित्रपटाने १.१५ कोटींची कमाई केली. तर पहिल्या शनिवारी १.६९ कोटी आणि रविवारी २.२२ कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसाचे 'सुभेदार'चे एकूण कलेक्शन ५.०६ कोटी झाले आहे.

बॉक्स ऑफिस बॉलिवूड चित्रपटांची गर्दी असताना देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने आपले स्थान पक्के केले आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे कलेक्शन चांगले झाले आहे. चित्रपटाकडून आता अपेक्षा अजून वाढल्या आहेत.

'सुभेदार'चे रेटिंग

दिग्पाल लांजेकर लिखित, अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित सुभेदार चित्रपटाला विविध प्लॅटफॉर्मवर रेटिंग देखील छान मिली आहे. IMDb आणि बुक माय शोवर चित्रपटाला १० पैकी ९.५ रेटिंग मिळाले आहेत. तर पेटीएम आणि गूगलवर ९८% रेटिंग मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT