Raavsaaheb Teaser You Tube
मनोरंजन बातम्या

Raavsaaheb Teaser: ‘देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं…’; ‘रावसाहेब’ चा उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज

Raavsaaheb Teaser Out: ‘गोदावरी’च्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक निखिल महाजन यांचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Raavsaaheb Teaser Shared On Social Media

‘गोदावरी’च्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक निखिल महाजन यांचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. निखिल महाजन दिग्दर्शित आणि अक्षय बर्दापुरकर निर्मित ‘रावसाहेब’ ची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. प्लॅनेट मराठी आणि ब्ल्यू ड्रॅाप फिल्म्स प्रस्तुत चित्रपटाच्या टीझरला अवघ्या काही वेळातच काही हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

चित्रपटाच्या रहस्यमय कथेवरून प्रेक्षकांची ‘रावसाहेब’बद्दलची उत्कंठा आताच ताणली गेली आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरची सुरुवात जंगलातील एका भयाण वास्तवात होताना दिसते. टीझरच्या सुरुवातीला मुक्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे या दोघीही महिला पोलिस हवालदाराच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या हातात असलेली रिव्हॉल्वर आणि टॉर्च दिसते. त्यासोबतच पुढे सोनाली कुलकर्णी, रश्मी आगदेकर आणि जितेंद्र जोशी हे स्टारकास्ट दिसून येत आहेत.

चित्रपटामध्ये नेमकं सोनालीने कोणतं पात्र साकारलंय हे तरी गुलदस्त्यात आहे. त्यासोबतच रश्मी आगदेकरने महिला पत्रकाराची आणि जितेंद्र जोशीने एका पोलिस हवालदाराची भूमिका साकरली आहे. या रहस्यमय कथानकाचा टीझर पाहताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. या टीझर वरुन एका वाघाची कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या रहस्यमय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी अगडेकर आणि जितेंद्र जोशी ही तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जिजीविशा काळे लिखित चित्रपटाचे अक्षय बर्दापूरकर, संदीप बासू, सेहेर बेदी, सुनील जैन, स्वप्नील भंगाळे, निखिल महाजन आणि नेहा पेंडसे निर्माते आहेत. (Marathi Actors)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक निखिल महाजन यांनी सांगितले, “ ‘रावसाहेब’च्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ही अशी कथा आहे जी, प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबतच खुर्चीला खिळवून ठेवणारी आहे. प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा ‘रावसाहेब’ला खऱ्या अर्थाने वेगळे करतो. आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही.”

तर ‘रावसाहेब’बद्दल निर्माते अक्षय बर्दापूरकर सांगतात, “ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा निखिल महाजनसोबत काम करण्याची संधी मिळतेय. निखिलसोबत काम करताना मी नेहमीच तयार असतो. एकतर आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि आम्ही दोघेही औरंगाबादचे आहोत. निखिलचे विषय हे नेहमीच खूप सुंदर असतात. निखिलच्या चित्रपटांमध्ये भावना असतात. हा सुद्धा एक संवेदनशील आणि आशयघन विषय आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT