Sonu Nigam Song canva
मनोरंजन बातम्या

Sonu Nigam Song : 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये सोनू निगमचं खास गाणं; चाहत्यांची वाढली उत्सुकता

Navra Maza Navsacha 2 New Song: अभिनेता सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटामधील एक खास गाणं गायक सोनू निगमने गायलं आहे. गाण्याला चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचा सुपरहिट ठरलेला 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट २००४मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मजबूत कमाई केली होती. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची त्यांच्या कॉमेडीने अनेक प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर प्रेक्षकांना 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली होती. अखेर चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. 'नवरा माझा नवसाचा२' हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'नवरा माझा नवसाचा२' हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटांचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला होता. ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाहद्दलची उत्सुकता आणखी वाढलेली दिसतेय. नुकताचं चित्रपटाच्या कलाकारांकडून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओने सर्व चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटामधल्या सोनु निगमच्या 'हिरवा निसर्ग...' या गाण्याला चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळाली होती. सोनुचं हे सहाबहार गाणं आजही अनेक लोकांच्या ओठांवर आहे. चित्रपटाच्या सिक्वलमध्ये देखील सोनुने एक खास गाणं गाणार आहे.

सोनू निगम याने 'नवरा माझा नवसाचा२' चित्रपटामधील एक खास गाणं गायल्याची माहिती चित्रपटाच्या टीमकडून त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 'सुपारी फुटली' हे गाणं सोनूने 'नवरा माझा नवसाचा२' या चित्रपटामध्ये गायलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. या गाण्याता व्हिडिओ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजेचं ७ सप्टेबर रोजी प्रदर्शित करण्यात आलं होतं. या दरम्यान सोनूचा सेटवरील BTS व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

'नवरा माझा नवसाचा२ ' या चित्रपटामध्ये वॅकी आणि त्याचं कुटंब एस.टी सोडून कोकण रेल्वेने प्रवास करताना दिसणार आहेत. त्यांची प्रवासादरम्यान होणारी मस्ती आणि जबरदस्त कॉमेडी प्रेक्षकांना २० सप्टेंबर रोजी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते सचिन पिळगांकर, सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्निल जोशी, हेमल इंगळे, वेभव मांगले, निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ जाधव असी दरदार आणि जबरदस्त स्टार कास्ट पाहायला मिळणार आहेत. त्यासोबतच कलाकारांच्या कॉमेडीमुळे चाहते खळखळून हसणार आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT