Navra Maza Navsacha 2: आता नॉनस्टॉप मनोरंजन होणार, 'नवरा माझा नवसाचा 2'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; तुम्ही पाहिलात का?

Navra Maza Navsacha 2 Trailer Out: 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाच्या ट्रेलरचा प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहत आहे.
Navra Maza Navsacha 2: आता नॉनस्टॉप मनोरंजन होणार, 'नवरा माझा नवसाचा 2'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; तुम्ही पाहिलात का?
Published On

मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांचा आगामी चित्रपट 'नवरा माझा नवसाचा २'चा (Navra Maza Navsacha 2) जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहते होते अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. या चित्रपटाच्या ट्रेलरचा प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहत आहे. हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाच्या टीजरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता वाढवणारा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खळखळवून हसवायला लावत आहे. यावरूनच आता चित्रपट किती कमाल असेल हे यावरूनच ठरवू शकता. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आता २० सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. तर संवाद संतोष पवार यांचे आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, संतोष पवार, हरिश दुधाडे,गणेश पवार अशी दमदार स्टारकास्ट एकत्र पाहायला मिळणार आहे.

Navra Maza Navsacha 2: आता नॉनस्टॉप मनोरंजन होणार, 'नवरा माझा नवसाचा 2'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; तुम्ही पाहिलात का?
Navra Maza Navsacha 2: नॉनस्टॉप कॉमेडी एक्स्प्रेसच्या प्रवासाला सुरूवात, 'नवरा माझा नवसाचा २'चा धमाकेदार टीझर आऊट

या चित्रपटासाठी वैभव जोशी, प्रवीण दवणे, अवधूत गुप्ते, संतोष पवार यांनी गीत लिहिले आहे. या गीतांना अवधूत गुप्ते, जितेंद्र कुलकर्णी, रविराज कोलथरकर यांनी संगीत दिले आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, सचिन पिळगांवकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभु अरोरा, विभावरी जोशी, सिद्धार्थ जाधव यांच्या दमदार आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. दीपाली विचारे, सॅड्रिक डिसोझा, अजिंक्य शिंदे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी-हेमल इंगळे ही जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची जावई, मुलगी अशा भूमिकेत दिसणार आहे. सासऱ्यांनी ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला, तसा नवस आता जावयाला फेडता येतो का? याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नवस फेडण्यासाठीच्या रेल्वे प्रवासात हिरे चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाचं कथानकही उलगडणार आहे. त्यामुळे मनोरंजक आणि थरारक अनुभव या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Navra Maza Navsacha 2: आता नॉनस्टॉप मनोरंजन होणार, 'नवरा माझा नवसाचा 2'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; तुम्ही पाहिलात का?
Navra Majha Navsacha 2 : तब्बल १९ वर्षानंतर 'नवरा माझा नवसाचा' सिक्वल येणार, रिलीज डेट जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com