Naal 2 First Song Out
Naal 2 First Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naal 2 First Song Out: ‘नाळ भाग २’मधील ‘भिंगोरी’ गाणं रिलीज, मोठा झालेला चैतू खऱ्या आईच्या भेटीला

Priya More

Naal 2 Movie:

'नाळ'च्या भरघोस यशानंतर नागराज मंजुळे (Nagraj Manjule) याचा दुसरा भाग म्हणजेच 'नाळ २' चित्रपट (Naal 2 Movie) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी 'नाळ २'चा टीझर रिलीज करण्यात आला होता.

आता या चित्रपटचं पहिलं वहिलं गाणं ‘भिंगोरी’ (Bhingori Song) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याच्या माध्यमातून मोठा झालेल्या चैतूचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चैतूच्या चेहऱ्यावरील निरागसता आताही तशीच दिसत आहे.

२०१८ मध्ये 'नाळ' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील चिमुकल्या चैत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाची नाळ प्रेक्षकांसोबत जोडली गेली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर नागराज मंजुळेने दुसरा भाग म्हणजेच नाळ २ प्रेक्षकांच्या भेटाला आणला आहे. या भागामध्ये चिमुकला चैतू मोठा झाल्याचे दाखवण्यात आले आहे. चैतूच्या आयुष्यामध्ये झालेले बदल आणि यावेळी तो त्याच्या खऱ्या आईला भेटतो हे दाखवण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'नाळ भाग २' चित्रपटातील ‘भिंगोरी’ हे पहिलं गाणं नुकताच प्रदर्शित झाले आहे. ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याला मास्टर अवन, कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांनी आवाज दिला आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ २' चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी केले आहे. ‘नाळ २’ चित्रपट येत्या १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'नाळ' चित्रपटामध्ये विदर्भातल्या नदीचं विस्तीर्ण पात्र दाखवण्यात आलं होतं. त्या नदीपात्रात पाणी कमी आणि वाळवंट जास्त होतं. असे असताना देखील पडद्यावर विदर्भ कधी नव्हे इतका विलोभनीय दाखवण्यात आला होता. ती कमाल केली होती सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या कॅमेऱ्याने तर अशा रखरखीत वातावरणात माया करणाऱ्या माणसांच्या सावलीत चैतू घडत होता. आता नाळच्या दुसऱ्या भागामध्ये चैतू मोठा झाल्याचे दाखवण्यात आले आहे. या भागात चैतू आपल्या खऱ्या आईला भेटायला पश्चिम महाराष्ट्रात आल्याचे दाखवण्यात आले आहे.

'भिंगोरी' गाण्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात आलेला चैतू निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतो. तो गावातील लोकांना भेटतो. ते देखील चैतूला पाहून खूप खूश होतात. अशामध्ये गावातील सर्वांना भेटल्यानंतर चैतू त्याच्या आईला बघतो असं दाखवण्यात आलं आहे. चैतूला पाहून त्याची आई देखील आनंदीत होते आणि तिथून पुढे नेमकं काय घडतं हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल. पुढं नेमकं काय घडणार या प्रश्नांची उत्तर चित्रपट रिलीज झाल्यानंतरच मिळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT