Nach Ga Ghuma Motion Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Nach Ga Ghuma: "गृहिणीची होते महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी!"; ‘नाच गं घुमा’ चे नवे मोशन पोस्टर पाहिलेत का?

Nach Ga Ghuma Motion Poster: २०२४च्या सुरूवातीलाच परेश मोकाशींनी 'नाच गं घुमा' चित्रपटाची घोषणा केली होती. आता नुकतंच दिग्दर्शकांकडून चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

Chetan Bodke

Nach Ga Ghuma Motion Poster

परेश मोकाशींनी २०२३ च्या सुरुवातीला 'वाळवी' चित्रपटातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केलं. या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. 'वाळवी'चे सर्वत्र जोरदार कौतुक झाल्यानंतर नुकतंच परेश मोकाशींनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. २०२४ च्या सुरूवातीलाच परेश मोकाशींनी 'नाच गं घुमा' चित्रपटाची घोषणा केली होती. आता नुकतंच दिग्दर्शकांकडून चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये दिग्गज अभिनेत्रींची फौज दिसणार आहे. (Marathi Film)

चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी असून चित्रपटाचा निर्माता स्वप्नील जोशी आहे. ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' चे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर बघून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, आशा गोपाल, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत यांच्यासोबतच चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत बालकलाकार मायरा वायकुळही दिसणार आहे. मायराने चित्रपटाबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवर दिली आहे. (Marathi Actress)

चित्रपटाबद्दल सांगत असताना मायरा आपल्या पोस्टमध्ये म्हणते, "स्त्री ही घराची राणी असली तरी घर, नोकरी, मूल सांभाळताना अजून दोन हातांची मदत लागतेच! ते वरचे दोन हात असतात मोलकरणीचे! मालकीण- मोलकरणीचे सुर जुळले की गृहिणीची होते महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी! ह्या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून उभ्या असतात. तुमच्या आमच्या घरातल्या, घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचं घर सांभाळून आपलं घर चालवणाऱ्या नारीशक्तीला त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत. ‘नाच गं घुमा’...!" (Social Media)

चित्रपटाची कथा महाराणी- परीराणीची या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्त्रियांच्या विविध स्वभाववैशिष्ट्यांवर, गमती-जमतींवर आधारित हा चित्रपट आहे. नुकतेच चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एका मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

Marathi Vijay Melava: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मराठी जनसागर|VIDEO

Methi Ladoo: लहान मुलं मेथीचे लाडू खायला नकार देतात? मग 'ही' ट्रिक वापरा आणि पाहा जादू!

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

SCROLL FOR NEXT