Mumbai Local Marathi Film Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mumbai Local Movie Poster: लोकल ट्रेनमधील धम्माल मस्ती रुपेरी पडद्यावर दिसणार, 'मुंबई लोकल'चा पोस्टर रिलीज

Mumbai Local Marathi Movie Poster: मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकलची ओळख आहे. मुंबईकरांसाठी लोकल हे उत्तम आणि सोयीस्कर असं साधन आहे. याच मुंबई लोकलवर आता एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकलची ओळख आहे. ही मुंबई लोकल दररोज लाखो प्रवाश्यांची ने- आण करते. मुंबईकरांसाठी लोकल हे उत्तम आणि सोयीस्कर असं साधन आहे. दररोज लाखो चाकरमानी या लोकलने प्रवास करतात. याच मुंबई लोकलवर आता एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मुंबई लोकल' असं चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाच्या कथानकात प्रवासा दरम्यान लोकलमध्ये घडणारे मनोरंजक किस्से चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

नुकतंच चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, मुंबई लोकल पाहायला मिळत आहे. तिच्या आजूबाजूला काही ट्रेन थांबलेल्या दिसत आहे. नेमप्लेटवर 'मुंबई लोकल' असं लिहिलेलं दिसत आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाच्या टीमने चित्रपटाची घोषणा केली आहे. सिद्धिविनायक चरणी दर्शन घेत निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केलेली आहे.

प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे आदी कलाकारही आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहेत. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी यांनी "मुंबई लोकल" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्राची राऊत, सचिन अगरवाल सहनिर्माते असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! कधीपर्यंत लागू होणार? वाचा सविस्तर

Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

Maharashtra Live News Update: बिद्री साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ लागू,

निलेश घायवळ प्रकरणात २ बड्या राजकीय नेत्यांची नावं, रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT