Hemant Dome On Jhimma 2 Remake Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhimma 2 Remake: खरंच करण जोहर 'झिम्मा २'चा हिंदी रिमेक तयार करणार?, हेमंत ढोमेने सांगितलं खरं कारण

Jhimma 2 Marathi Movie: गेल्या काही दिवसांपासून 'झिम्मा २'चा हिंदी रिमेक येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अखेर या चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने ही चर्चा होण्यामागचे कारण सांगितले आहे.

Priya More

Jhimma 2 Released Today:

'झिम्मा' चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर 'झिम्मा २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी सिनेरसिकांसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. कारण आज बहुप्रतीक्षित 'झिम्मा २' चित्रपट प्रदर्शित झाला. यावेळी 'झिम्मा २' मधून ७ बायकांची अनोखी कहाणी उलगडणार आहे.

या चित्रपटाच्या पोस्टर, टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा चित्रपट देखील चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. अशामध्ये गेल्या काही दिवसांपासून 'झिम्मा २'चा हिंदी रिमेक येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अखेर या चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने ही चर्चा होण्यामागचे कारण सांगितले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'झिम्मा'चा दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि त्याची पत्नी क्षिती जोगने नुकताच झिम्मा २ संदर्भात लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये या दोघांनी झिम्मा २ च्या हिंदी रिमेकचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, 'खरं सांगू का? गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा खरंच सुरू आहे. याला मी स्पष्टपणे नकार देणार नाही. क्षिती आणि करणसरांनी मिळून आताच एक चित्रपट केला. त्याच काळात या दोघांची देखील या कथेवर खूप चर्चा झाली.'

'करणसर आणि क्षितीची चर्चा सुरू असताना झिम्मा २ चा हिंदी रिमेक येणार असून कलाकार देखील निश्चित झाल्या अशा चर्चा पसरल्या. पण खरं तर यामध्ये कलाकार कोण असणार हे अद्याप निश्चित झाले नाही. यापेक्षा जास्त मी यावर काहीच बोलू शकणार नाही.', असं सांगत हेमंत ढोमे याने झिम्मा २ चा हिंदी रिमेक येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तर यावर क्षिती जोगने सांगितले की, 'एवढ्या लवकर हा चित्रपट हिंदीत तयार केला जाणार नाही. सध्या फक्त चर्चा सुरू आहे. पण २०२४ मध्ये हिंदी रिमेक प्रदर्शित होईल असंही काही नाहीय. ही बायकांची गोष्ट असल्याने मी कधीच या चित्रपटाच्या रिमेकला विरोध करणार नाही. सगळ्या भाषेत चित्रपट झाला पाहिजे फक्त आमची पात्र त्यांना तेवढ्याच प्रामाणिकपणे मांडता आली पाहिजेत. तो प्रामाणिकपणा जपला गेला तर या चित्रपटातील कलाकार आणि याची निर्माती म्हणून मला खूप जास्त आनंद होईल.'

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ ची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. या संपूर्ण टीमने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. आता वेळ आली आहे ती म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याची आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करेल हे लवकरच समजेल. दरम्यान, १९ नोव्हेंबर २०२१ ला प्रदर्शित झालेल्या झिम्मा चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तब्बल १०० दिवस हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चालला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT