Dharmaveer 2  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmaveer 2 : 'धर्मवीर २' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Dharmaveer 2 Box Office Collection: दिग्दर्शक प्रविण तरडेंचा बहुप्रतिक्षित 'धर्मवीर २' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय.

Saam Tv

दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'धर्मवीर २' आखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसते. 'धर्मवीर' या चित्रपटानंतर त्याच्या सिक्वलची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. या चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत तर अभिनेता क्षितिज दाते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसत आहेत.

'धर्मवीर २' या चित्रपटाचे पटकथा आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यातील घटना दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय.

रिपोर्टनुसार, प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 'धर्मवीर २' या चित्रपटाने १.६५ कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांची चित्रपटगृहामंमध्ये भरपूर गर्दी पाहायला मिळाली होती. हा चित्रपट बनवण्यासाठी एकुन १५ कोटींचा बजेट असल्याची माहिती मिळाली आहे. 'धर्मवीर' या चित्रपाला सुद्धा प्रेक्षकांडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भगाप्रमाणे दुसऱ्या भागामध्ये देखील अभिनेता क्षितिज दाते यानी चांगला अभिनय केला आहे. या चित्रपटामध्ये क्षितिजचा लूक पुर्णत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखा लूक केला आहे.

परंतु चित्रपटामधील एका ट्विस्टमुळे चाहत्यांना आश्चचर्यचकित केले आहे. चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: त्यांची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या चित्रपटामधील या एन्ट्रीला चित्रपटगृहांमध्ये टाळ्यांचा आणि शिट्यांचा कडकडाट पाहायला मिळत आहे.'धर्मवीर' चित्रपटाप्रमाणे धर्मवीर २ हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर ठरेल का? हे पाहाणं रंजक ठरले.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Romantic Places In Kalyan: पार्टनरसोबत डेटवर जायचा प्लान करताय? कल्याणमधील 4 रोमॅन्टिक ठिकाणे, आनंद होईल द्विगुणित

Satara News : डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती, मृत्यूचं खरं कारण समोर, शेवटचा कॉल कोणाला केला?

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ८व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

Maharashtra Live News Update: जळगावमध्ये भरधाव बस टोलनाक्याच्या भिंतीवर धडकली, एकाचा मृत्यू

Lung Cancer Symptoms: फुफ्फुसांचा कॅन्सर होण्यापूर्वी हाता-पायांवर दिसतात ७ मोठे बदल, वेळीच लक्षणं ओळखा

SCROLL FOR NEXT