Ekda Yeun Tar Bagha Teaser Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ekda Yeun Tar Bagha Teaser Out: 'एकदा येऊन तर बघा'चा एकदम फ्रेश आणि खुसखुशीत टीझर आऊट, तुम्ही पाहिलात का?

Prasad Khandekar Movie: या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसाद खांडेकरने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

Priya More

Ekda Yeun Tar Bagha Movie:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता प्रसाद खांडेकर लवकरच मराठी प्रेक्षकांसाठी नव्या चित्रपटाची खास मेजवाणी घेऊन येणार आहे. प्रसाद खांडेकरांचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसाद खांडेकरने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

या चित्रपटातून १६ विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर आऊट झाला. हा टीझर प्रेक्षकांना आवडला असून ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकाच्या भेटीला आला आहे. १ मिनिटं ४ सेकंदाच्या या टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांना कलाकारांच्या भूमिका आणि कथानकाविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. या टीझरची सुरूवातच 'एकदा येऊन तर बघाच. या आमच्या हॉटेलामध्ये तुमचे स्वागत आहे' अशी होते. या टीझरच्या माध्यमातून या चित्रपटातील प्रत्येक पात्राची ओळख करून देण्यात आली आहे. त्यांची नावं टीझरमधून उघड झाली आहेत.

प्रसाद खांडेकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'माझा लेखक दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. 'एकदा येऊन तर बघा,' या आमच्या नव्या कोऱ्या हॉटेलचे इरसाल चालक आणि मालक यांची ओळख करून द्यायला घेऊन आलो आहोत, हा एकदम फ्रेश आणि खुसखुशीत टीझर! #EkdaYeunTarBagha २४ नोव्हेंबरपासून फक्त चित्रपटगृहांत.' प्रसाद खांडेकरने या टीझरच्या माध्यमातून चित्रपटाची रिलीज डेट देखील शेअर केली आहे.

गेल्यावर्षी म्हणजे ऑक्टोबर २०२२ मध्ये या चित्रपटाची घोषणा झाली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचा टीझर आऊट करण्यात आला आहे. हा टीझर पाहून सर्वजण ट्रेलरची वाट पाहत आहेत. कारण टीझरच ऐवढा भन्नाट आहे तर ट्रेलर खूपच जबरदस्त असेल असा अंदाज लावला जात आहे. २४ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

‘एकदा येऊन तर बघा’, या चित्रपटामध्ये विशाखा सुभेदार, सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासह १६ दमदार कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर आहे. दिग्दर्शक म्हणून प्रसाद खांडेकरचा हा पहिलाच चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT