Swapnil Joshi Bai Ga Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi: "आता लव्ह ट्रँगल बदलावा लागणार..."; स्वप्निल जोशी 'बाई गं' मध्ये एकाच वेळी ६ अभिनेत्रींसोबत दिसणार

Swapnil Joshi Film: स्वप्निलचा लवकरच 'बाई गं' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतंच अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये, या चित्रपटामध्ये तो एका वेळी सहा अभिनेत्रींसोबत दिसणार असल्याचं सांगितलं आहे.

Chetan Bodke

मराठी सिनेसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' अर्थात अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे. स्वप्निल जोशीने गेल्या काही दिवसांपूर्वी 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती विश्वात पदार्पण करत असल्याचे त्याने जाहीर केले होते. अशातच स्वप्निलचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तो म्हणजे, 'बाई गं' (Bai Ga Movie). नुकतंच अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये, तो या चित्रपटामध्ये एका वेळी सहा अभिनेत्रींसोबत दिसणार असल्याचं सांगितलं आहे. (Marathi Film)

चित्रपटामध्ये स्वप्निल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'नाच गं घुमा'नंतर अवघ्या काही दिवसांतच स्वप्निल 'बाई गं' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा हा चित्रपट येत्या १४ जून ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Actors)

स्वप्नीलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या आगामी चित्रपटाविषयी सांगितले, " येत्या काळात लव्ह ट्रँगल बदलावा लागणार आहे. आगामी चित्रपटामध्ये मी तब्बल एकाचवेळी ६ अभिनेत्रींसोबत एकटा हिरो म्हणून दिसणार आहे. कायम लव्हस्टोरी करताना लव्ह ट्रँगल होताना दिसायचा पण आता हे चित्र थोड बदलणार आहे. मी वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. विभिन्न विचाराच्या आणि विविध वयोगटातील अभिनेत्रींसोबत काम करण्याचा अनुभव देखील तितकाच कमालीचा आहे. या सहा अभिनेत्री सगळ्या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नेहा खान, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहेरे अशा अफलातून अभिनेत्रींसोबत मी 'बाई गं' चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे" (Marathi Actress)

निर्मिती, अभिनय आणि अजून बऱ्याच विविधांगी रूपातून स्वप्नील या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. चाहते देखील त्याच्या या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. २०२४ या वर्षात स्वप्नील स्त्री सक्षमीकरण असलेल्या चित्रपटाच्या सोबतीने अजून काय वेगळं करणार याची उस्तुकता सगळ्यांना लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्वप्निल जोशीचा आणि प्रार्थना बेहरेचा शूटिंग दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोघांचाही डान्स करतानाचा तो व्हिडीओ होता. ‘मितवा’ चित्रपटानंतर हे दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath : लिफ्टमध्ये एकटा दिसला, बिल्डिंगमधील व्यक्तीचा 12 वर्षीय मुलावर हल्ला; हातालाही चावला, अंबरनाथमध्ये खळबळ VIDEO

'लवकरच घरी आलो जेवायला'; आईला शेवटचा फोन, J.J हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरुन समुद्रात उडी

Wainganga Flood : वैनगंगेला मोठा पुर; ब्रह्मपुरी तालुक्यातील ८ गावांना पाण्याचा वेढा, अनेक कुटुंबाना हलविले सुरक्षितस्थळी

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह अनेक भागात पाऊस, नागरिकांचे हाल

Bigg Boss 19 : टीम इंडियाच्या या खेळाडूची Ex पत्नीची बिग बॉस १९ मध्ये एन्ट्री?

SCROLL FOR NEXT