Swargandharv Sudhir Phadke Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swargandharv Sudhir Phadke: माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात..., 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा टीझर रिलीज

Swargandharv Sudhir Phadke Teaser: स्वरगंधर्व अशी ओळख असलेल्या सुधीर फडके (Sudhir Phadke) यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला.

Priya More

Swargandharv Sudhir Phadke Movie:

मराठी सिनेरसिकांच्या मनोरंजनासाठी नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही चित्रपटांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काही चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे तर काहीं प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वरगंधर्व अशी ओळख असलेल्या सुधीर फडके (Sudhir Phadke) यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला.

मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर बायोपीक आले आहेत. आतापर्यंत डॉ. काशीनाथ घाणेकर, लोकमान्य टिळक, साने गुरुजी, शाहीर साबळे, वसंतराव देशपांडे, महात्मा फुले अशा अनेक व्यक्तिमत्वांचा जीवनप्रवास आपल्याला रूपेरी पडद्यावर पाहायला मिळाला आहे. आता स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा जीवनप्रवास आपल्याला रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा नुकताच रिलीज झालेला टीझर पाहून तुमच्याही डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाच्या (Swargandharv Sudhir Phadke Movie) टीझरमध्ये सुधीर फडके यांचा बालपणापासून ते स्वरगंधर्व होण्यापर्यंतचा प्रवास पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये शेवटी रेडिओवर गीतरामायणाची झलक दिसून येते. सुधीर फडके हे मधुर आवाजामध्ये गीतरामायण गाताना दिसतात. बाबूजी गाणं गाताना गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे डोळे पाणावतात.

प्रसिद्ध दिग्दर्शक योगेश देशपांडे हे बाबूजींच्या म्हणजेच सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे हे सुधीर फडके यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सुनील बर्वेव्यतिरिक्त मृण्मयी देशपांडे, आदिश वैद्य हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांनी कोल्हापूरमधील वामनराव पाध्ये यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते. त्यांचे जन्मनाव राम फडके असे होते. त्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून सुधीर असे केले. मराठी संगीत विश्वामध्ये त्यांना बाबूजी या नावानं देखील ओळखलं जात होतं. १९४१ मध्ये त्यांनी एचएमव्हीसोबत करिअरला सुरुवात केली.

१९४६ मध्ये बाबूजींनी प्रभात फिल्म कंपनीच्या गोकूळ चित्रपटापासून संगीत दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात १११ चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. त्यात काही हिंदी चित्रपटांचा देखील समावेश आहे. बाबूजींनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली होती. २९ जुलै २००२ मध्ये त्यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. त्यांचा जीवनप्रवास खूपच प्रेरणादायी होता. त्यामुळे दिग्दर्शक योगेश देशपांडे हे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT