Humare Ra aaye Hain Song:
रामानंद सागर यांच्या 'रामायण' या पौराणिक मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. ही मालिका आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरामध्ये पोहचले. मालिकेतील प्रत्येक सीन्स, संवाद प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या शोमध्ये अरुण गोविल (Arun Govil) यांनी भगवान रामाची भूमिका साकारली होती. दीपिका चिकालिया (Dipika Chikalia) यांनी सीतेची आणि सुनील लहरी यांनी (Sunil Lehri) लक्ष्मणाची भूमिका साकारली होती.
राम आणि सीतेच्या भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांना त्या काळातही देव म्हणूनच पाहिले जात होते आणि आजही त्यांचा आदर कमी झालेला नाही. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी यांना सर्वात आधी आमंत्रण पाठण्यात आले होते. हे तिघांनीही या सोहळ्यासाठी हजेरी लावली.
अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी यांनीही अयोध्येतून रामभक्तांसाठी खास भेटवस्तू आणल्या. या तिघांनी अयोध्येत 'हमारा राम आये हैं' नावाचे भजन रचून भक्तांना खूश केले. आज राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी 'हमारा राम आये हैं' हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. या तिघांकडून ही विशेष भेट मिळाल्याने भक्ताला खूप आनंद झाला आहे. या गाण्याचे चित्रीकरण अयोध्येत झाले असून यात तिन्ही कलाकार दिसत आहेत. सोनू निगमने आपल्या सुंदर आवाजाने हे गाणं गायलं आहे. हे गाणं ऐकून सर्वजण रामभक्तीत हरवून गेले आहेत.
दरम्यान, रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका 53 देशांमध्ये दाखवली गेली आहे आणि जगभरातील 650 दशलक्षाहून अधिक प्रेक्षकांनी ही मालिका पाहिली आहे. ज्यामुळे ही जगातील सर्वात जास्त पाहिली जाणारी पौराणिक मालिका ठरली आहे. 2020 मध्ये कोरोना काळात असलेल्या लॉकडाऊन दरम्यान या मालिकेचे पुन्हा प्रसारण करण्यात आले. याच काळातही या मालिकेने एक विक्रम केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.