Satyashodhak Film Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Satyashodhak Film Poster: हुबेहुब महात्मा फुले! संदीप कुलकर्णींनी ज्योतिबांच्या भुमिकेत जिंकलं सर्वांचं मन, आता उत्सुकता चित्रपटाची

Satyashodhak Film: महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Satyashodhak Film Poster

समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे, संघर्ष आणि विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून, स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित लवकरच आगामी चित्रपट येत आहे. त्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा ‘सत्यशोधक’ चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार? आतापर्यंत ही माहिती गुलदस्त्यातच होती. अखेर याचा खुलासा झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. नुकतंच निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले कोण दिसणार आणि चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. चित्रपट पुढच्या वर्षी ५ जानेवारीला अर्थात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Marathi Film)

रिलीज झालेल्या ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या पोस्टरवर अभिनेते संदीप कुलकर्णी झळकणार आहेत. ज्योतिबांसारखे हुबेहुब दिसणाऱ्या संदीप कुलकर्णी यांच्या लूकची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत होत आहे. वेशभूषा आणि रंगभूषा अगदी योग्य जमून आल्याने खरेच महात्मा ज्योतिराव फुले समोर आहेत की काय असा भास होतो. त्यामुळे अभिनेत्याची योग्य निवड आणि लूकचा संपूर्ण अभ्यास करूनच ही भूमिका साकारली गेल्याचे स्पष्ट होत आहे. (Marathi Actors)

अभिनेते संदीप कुलकर्णींसोबत राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

‘विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...’ अशा कठोर शब्दांमध्ये शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यातील संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. इंग्लंडमधील पेन्झान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बायोग्राफीकल फिचर फिल्म या पुरस्काराने तर, जर्मनीत होहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये द्वितीय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान या चित्रपटाला मिळाला. (Entertainment News)

समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित चित्रपटाची निर्माती प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ यांनी केली आहे. रिलायन्स एंटरटेन्मेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून चित्रपट ५ जानेवारी २०२४ ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT