Raavrambha Marathi Film Music Launch Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raavrambha Music Launch: रंगमंचावर अवतरला शिवकाळ; रावरंभाच्या म्युझिक लाँचिंग सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप

‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातील प्रेमकथेचे मोरपंखी पान उलगडून दाखविणारा भव्य संगीत अनावरण सोहळा कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

Chetan Bodke

Raavrambha Marathi Film Music Launch: हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्याला माहित आहेत. पण या वीरांच्या पाठीमागे सावलीसारखी ठामपणे उभी राहणाऱ्या निर्व्याज प्रेम करणाऱ्या त्यांच्या सखीची गोष्ट क्वचितच आपल्याला माहित असते. कित्येक आया बहिणींनी स्वतःचे कुंकू वाहिले तेव्हा कुठे हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले आहे.

स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला ‘राव’ अन् त्या तलवारीची खडी ढाल ‘रंभा’ यांची रांगडी प्रेमकहाणी उलगडून दाखविणारा निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक चित्रपट १२ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या प्रेमकथेचे मोरपंखी पान उलगडून दाखविणारा भव्य संगीत अनावरण सोहळा कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

याप्रसंगी रंगमंचावर शिवकाळ अवतरला. संगीत अनावरणाचे औचित्य साधून चित्रपटातील कलाकारांनी ऐतिहासिक वेशात रंगमंचावर येत आपल्या भूमिकेची छोटीशी झलक उपस्थितांना दाखविली. ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे वाक्य मानणाऱ्या रावजीला आपल्या प्रेमासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागतं याची चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा ‘रावरंभा’ चित्रपटातून उलगडणार आहे. (Latest Marathi News)

यावेळी बोलताना निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार म्हणाले की, ‘सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी. आम्ही साताऱ्याचे तर पहिला चित्रपट हा महाराजांवरच असावा आणि आमच्या पूर्वजांनीही आपल्या भूमीसाठी रक्त सांडले त्या पूर्वजांना आणि छत्रपती शिवरायांना आदरांजली देण्यासाठी आम्ही ‘रावरंभा’ चित्रपटाच्या निर्मितीचं पाऊल उचललं. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट उद्योगाचा अनुभव घेताना महाराजांचा पराक्रम आणि साहस याची प्रचिती चित्रपटातून अनुभवयाला मिळणं हे आमच्यासाठी भाग्याचं असल्याचे सहनिर्माते डॉ. अजित भोसले आणि संजय जगदाळे यांनी सांगितले. ऐतिहसिक चित्रपटाची मोट बांधणं एक आव्हान असतं. कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते यांच्या सहकार्यामुळेच हा चित्रपट यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकल्याची भावना दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली. (Latest Entertainment News)

चित्रपटातील गीतांना आपल्या मातीचा गंध असून शिवकाळात घेऊन जाणारी, मनाला भिडतील अशी ही गाणी करताना खूप समाधान लाभल्याची भावना संगीतकार अमितराज आणि गायिका आनंदी जोशी, गायक रवींद्र खोमणे यांनी यावेळी व्यक्त केली.

‘साथ साथ’, ‘हां मर्दा’ अशी स्फुरण चढणारी गीते आणि ‘तुझ्या दावणीला’, ‘एक रंभा एक राव’ या प्रेमगीताचा नजराणा चित्रपटातील गीत-संगीतातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतांना आदर्श शिंदे, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, रवींद्र खोमणे या गायकांचा स्वरसाज लाभला आहे. संगीतकार अमितराज यांनी ही सर्व गीते संगीतबद्ध केली आहेत. (Marathi TV Serial)

‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे.

१२ मे ला ‘रावरंभा’ ही ऐतिहासिक प्रेमकहाणी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT