Riteish Deshmukh Who Is 1st Love: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडित काढले. गेल्या अनेक दिवसांपासून रितेश आणि जिनिलीया सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून चर्चेत राहिले आहे. या लोकप्रिय कपलने जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ ला लग्नबंधनात अडकले. तब्बल अकरा वर्षांनंतर रितेशने त्याच्या पहिल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
नुकतेच रितेशने ‘मुंबई तक’ ला दिलेल्या एका मुलाखतीत दिलखुलास गप्पा मारल्या. या मुलाखतीत त्याने वेड चित्रपट, जिनिलीया आणि वडिल विलासराव देशमुख यांच्याबद्दल काही विधान केले. यावेळी रितेशला “राजकारण की सिनेसृष्टी, तुमचं पहिलं प्रेम कोणतं ?” या प्रश्नावर रितेश म्हणतो, “ खरं सांगायचं तर, माझं पहिलं प्रेम राजकारण आहे. जरी ते माझं पहिलं प्रेम असलं तरीही मला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. मला लहानपणापासून राजकारणाचे धडे मिळाल्यामुळे आजुबाजुला काय घडतंय. याची माहिती आहे.”
सोबतच पुढे रितेश म्हणतो, “मी एका राजकारणी घराण्यात वावरलो आहे, त्यामुळे आजूबाजूला काय घडतंय, कशा गोष्टी घडतात, याची जाणीव ठेवणं, त्यामुळे ते कायमच माझं पहिलं प्रेम असेल आणि असणार. ते अपुरं प्रेम आहे, असंही मी म्हणू शकत नाही. ते प्रेम पुर्ण व्हावं अशीही इच्छा नव्हती. पण राजकारणाबद्दल प्रेम आणि आपुलकी हे कायमच असेल.” असे रितेशने म्हटले.
तुमचे दोन्हीही भाऊ आमदार आहेत, मग तुम्हाला पण खासदार किंवा मंत्री होण्याची इच्छा आहे का? यावर रितेश म्हणतो, “नाही. मला घराणेशाहीचा वाद पुढे उकरून काढायचा नाही. माझे जे काही स्वप्न आहेत ते, मी चित्रपटाच्या माध्यमातूनच साकारेल. चित्रपटातून साकारणारे स्वप्न कदाचित माझ्यासाठी फार सोप्प आहे.”
भविष्यात राजकारणात जाण्याचा काही विचार आहे का? यावर रितेश म्हणतो, “आपला घटकाचा काही भरोसा नसतो, तर भविष्याचा विचार फार दुरचा आहे. मी अभिनय क्षेत्रात गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहे. चाहत्यांनी प्रेम दिले, म्हणून मी अजून आहे. मी जे काम करतो, त्यात माझं हृदय आहे आणि तेच काम मी मरेपर्यंत करावं अशी माझी इच्छा आहे.”
रितेशचे वडिल दिवंगत नेते विलासराव देशमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, रितेश महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यात जन्मलेला आहे. रितेश सोडून त्याचे दोन्हीही भाऊ राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. मोठा भाऊ अमित देशमुख आणि धाकटा भाऊ धिरज देशमुख आमदार असून रितेश देशमुख सिनेसृष्टीत कार्यरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.