Naal 2 Official Teaser Release Instagram
मनोरंजन बातम्या

Naal 2 Teaser Release: पहिल्या भागाच्या आठवणींचा खजिना मोठा चैत्या पुन्हा उलगडणार, ‘नाळ २’चा टीझर पाहिलात का?

Naal 2 Teaser Out: सुधाकर रेड्डी यंक्कटी दिग्दर्शित ‘नाळ २’ ची सध्या सोशल मीडियावर तुफान सुरू आहे.

Chetan Bodke

Naal 2 Official Teaser Release

सुधाकर रेड्डी यंक्कटी दिग्दर्शित ‘नाळ २’ ची सध्या सोशल मीडियावर तुफान सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकताच ‘नाळ २’चा सोशल मीडियावर टीझर रिलीज झाला असून चाहत्यांकडून टीझरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ २’च्या टीझरला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटातलं पहिलं वहिलं ‘भिंगोरी’ हे गाणं रिलीज झालं होतं. आता त्यानंतर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. चित्रपटातला चैत्या आता सिक्वेलमध्ये मोठा झालेला दाखवला आहे. आपल्या बोबड्या बोलीने सर्वांनाच आपलंसं करणाऱ्या चैत्याची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना टीझरमध्ये दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीला छोटा चैतू बैलगाडीमध्ये बसलेल्या त्याच्या आईला पळत- पळत जाऊन छत्री देताना दिसतो. आणि त्यानंतर तो थेट मोठा झालेला दिसत आहे.

टीझरमध्ये पुढे, तो त्याच्या आईला आपल्या सायकलीवर बसवून कुठे तरी नेताना दिसत आहे. तो त्याच्या खऱ्या आईला बस असं म्हणतो. आणि तो कुठे तरी जातो. यावेळी चैतू आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतोय, असे ‘नाळ २’ च्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

टीझरला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत असून हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘नाळ’ चा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सुधाकर रेड्डी यंक्कटी यांना तर, सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा श्रीनिवास पोकळेला पुरस्कार मिळाला होता.

‘नाळ २’चा टीझर पाहिल्यानंतर जितेंद्र जोशीची प्रतिक्रिया

‘नाळ २’चा टीझर रिलीज पाहून अभिनेता जितेंद्र जोशी म्हणतो, “ती चैतू सोबत बोललीच नाही त्यामुळं मला लई राग आला होता तिचा... चैतू पहात राहिला आणि मी रडत... आता मोठा झालाच आहे तर बोल गं बाई त्याच्याशी... खूप खूप शुभेच्छा मित्रांनो... पहिल्या भागाच्या आठवणींचा खजिना मोठा चैत्या पुन्हा उलगडणार, येत्या दिवाळीत नात्यांची नाळ अजून घट्ट होणार!”

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत श्रीनिवास पोकळे चैत्याच्या भूमिकेत, नागराज मंजुळे चैत्याच्या वडीलांच्या भूमिकेत तर दीप्ती देवी पार्वती म्हणजे चैत्याच्या खऱ्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT