बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध निर्मात्याचे निधन झाले आहे. बाबुभाई लतीवाला असे या निर्मात्याचे नाव आहे. बाबुभाई यांच्यावर आज २१ ऑक्टोबर रोजी जुहू येथे कब्रस्थानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बॉम्बीनो व्हिडीओ कॅसेट्सचे प्रमुख बाबुभाई लतीवाला यांचे रात्री २ वाजता बांद्रा येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बाबुभाई लतीवाला व्हिडीओ किंग म्हणून देखील प्रसिद्ध होते. बॉम्बीनो व्हिडीओ कॅसेट्सचे ते किंग होते.
बाबुभाई यांचे सलमान खानशी खास कनेक्शन होते. त्यांनी सलमान खानच्या 'वीरगती' चित्रपटाची निर्मिती केली होती. याचसह त्यांनी चंकी पांडे, मोनिका बेदी आणि इंदर कुमार यांचा 'तिरछी टोपीवाला', गोविंदा, वर्ष उसगावकर, गुलशन ग्रोवर आणि रजा मुराद यांचा 'बेटा हो तो ऐसा' या चित्रपटांची देखील निर्मिती केली होती. (Celebrity)
अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार, 'बाबूभाई हे लो-प्रोफाईल व्यक्ती असून ते ऑकलँडमध्ये बराच काळापासून स्थायिक झाले होते. ते काही दिवसांसाठी भारतात आले असल्याचा अंदाज आहे सूत्रांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी बाबुभाई यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. बाबूभाईंच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.