Swara Bhaskar Prays for Gaza Kids
Swara Bhaskar Prays for Gaza Kids Instagram @reallyswara

Swara Bhaskar Post: 'माझी मुलगी 'गाझा'मध्ये जन्मली असती तर...' स्वरा भास्करची मन हेलावून टाकणारी पोस्ट

Kids In Gaza: स्वरा भास्करला सतावतेय गाझामधील मुलांची चिंता.
Published on

Swara Bhasker On Palestine - Israel War:

अभिनेत्री स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला. स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या मुलीचे नाव 'राबिया' असे ठेवले आहे. स्वराने सोशल मीडियावर मुलीचे फोटो देखील शेअर केले होते.

आता स्वरा भास्कर मुलगी 'राबिया'मुळे चर्चेत आहे. स्वरा भास्करने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. भावुक होत म्हटले आहे की, जर आमची मुलगी गाझा येथे जन्मली असती तर काय झाला असतं? स्वराची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. चला पाहूया स्वराने तिच्या पोस्टमध्ये काय लिहिले आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्वरा भास्करची पोस्ट

'नुकतेच बाळ झालेल्या आईला हे माहित असेल की ती आपल्या नवजात मुलाकडे समाधान, शांती आणि आनंदाच्या भावनेने पाहत तासन् तास घालवू शकते. मी काही वेगळी नाही. आणि मला खात्री आहे की जगभरातील अनेक मातांच्या अशाच भावना आहेत जेव्हा त्या त्यांच्या बाळाकडे पाहतात. माझ्या मनात सतत भयानक विचार येत आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे...

मी माझ्या चिमुरडीच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो की ती गाझामध्ये जन्माला आली तर मी तिचे रक्षण कसे करू शकेन आणि ती कधीही अशा परिस्थितीत सापडू नये म्हणून प्रार्थना करत आहे आणि मग तिला कोणता आशीर्वाद मिळाला की ती जन्माला आली आहे आणि त्यांना कोणता शाप आहे? गाझामध्ये जन्मलेली मुलं कैद झालेल्या आकाशाखाली रोज मारली जात आहेत?!? (Latest Entertainment News)

Swara Bhaskar Prays for Gaza Kids
Bigg Boss 17 Update: 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानच्या रडारवर कोण येणार अन् कोणाला देणार भाईजान कानमंत्र?

गाझामध्ये असलेल्या मुलांना वेदना आणि मृत्यूपासून वाचविण्यासाठी जो देव तुमचा ऐकेल त्याच्याकडे प्रार्थना करा; कारण जग त्यांचे रक्षण करणार नाही.' या कॅप्शनसह स्वरा भास्करने हार्ट ब्रेकचं चिन्ह शेअर केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com