Rohit Mane Wife Ukhana Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rohit Mane Wife Ukhana: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित मानेच्या बायकोने घेतला जबरदस्त उखाणा, नम्रता संभेरावने शेअर केला VIDEO

Priya More

Ekda Yeun Tar Bagha Movie:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) नुकताच मराठी प्रेक्षकांसाठी नव्या चित्रपटाची खास मेजवाणी घेऊन आला. प्रसाद खांडेकरांचा ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha Movie) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसाद खांडेकरने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

त्याच्या या चित्रपटामध्ये महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील अनेक कलाकार आहेत जे प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहेत. या चित्रपटामध्ये महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील रोहित माने देखील मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच रोहित मानेच्या पत्नीने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक खास उखाणा घेतला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर रोहित मानेच्या पत्नीने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रोहित माने त्याच्या पत्नीसोबत उभा आहे. यावेळी रोहित आणि त्याच्या पत्नीसोबत प्रसाद खांडेकर, वनिता खरात आणि चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक दिसत आहेत. तिला उखाणा घेण्यासाठी सर्वजण फोर्स करतात. त्यावेळी रोहितची पत्नी उखाणा घेते. 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत सावत्या म्हणतो लगा लगा लगा…आमचा चित्रपट सगळ्यांनी एकदा येऊन तर बघा', असा उखाणा ती घेते. तिच्या उखाण्यानंतर सर्वजण जोरजोरात ओरडताना दिसतात.

नम्रता संभेरावने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'आमच्या सावत्याच्या बायकोने प्रोमोशन दरम्यान घेतलाय भारी उखाणा…’एकदा येऊन तर बघा’ जवळच्या चित्रपटगृहात हाऊसफुल्ल प्रतिसाद' असं लिहिलं आहे. दरम्यान, या चित्रपटातून १६ विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. हा चित्रपट ८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक देखील चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत.

दरम्यान, ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटामध्ये विशाखा सुभेदार, सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासह १६ दमदार कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर आहे. दिग्दर्शक म्हणून प्रसाद खांडेकरचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

SCROLL FOR NEXT