Kedar Shinde  Saam TV
मनोरंजन बातम्या

Kedar Shinde: तुझा मी ऋणी आहे पण फक्त एकच विनंती..., २०२३ च्या शेवटी केदार शिंदेंची भावनिक पोस्ट चर्चेत

Kedar Shinde Post For 2023: २०२३ मध्ये केदार शिंदे हे 'महाराष्ट्र शाहीर' आणि 'बाईपण भारी देवा' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचसोबत या चित्रपटांनी जबरदस्त कमाई देखील केली.

Priya More

Kedar Shinde Instagram Post:

२०२३ या वर्षातला आज शेवटचा दिवस आहे. एकीकडे सर्वजण नव वर्षाच्या स्वागताची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे काही जण २०२३ या वर्षाने आपल्याला काय-काय दिलं हे आठवत आहेत. २०२३ हे वर्ष मराठी सिनेरसिकांसाठी (Marathi Film) खूपच खास ठरले. या वर्षात मनोरंजनाची उत्तम मेजवाणी घेऊन अनेक दिग्दर्शक जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. यामधील एक दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे (Kedar Shinde).

२०२३ मध्ये केदार शिंदे हे 'महाराष्ट्र शाहीर' आणि 'बाईपण भारी देवा' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचसोबत या चित्रपटांनी जबरदस्त कमाई देखील केली. याबाबत केदार शिंदे यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले. अशामध्ये आता २०२३ च्या शेवटच्या दिवशी केदार शिंदे यांनी केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

केदार शिंदे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर चेहऱ्याला हात लावून बसलेला त्यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते कसला तरी विचार करत बसले असल्याचे दिसत आहे. या फोटोवर त्यांनी भलामोठा मेसेज लिहिला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'प्रिय २०२३,

तू खूप काही देऊन चालला आहेस. आत्मविश्वास, जाणीव, जबाबदारी... असं बरंच काही! बाबांच्या (शाहीर साबळे) यांच्या जन्मशताब्दी वर्षात 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमा करण्याचं बळ तू दिलंस... घराघरात असणाऱ्या स्त्रियांना सलाम करण्याची संधी 'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या निमित्ताने तू दिलीस..."

या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी पुढे असे लिहिले की, 'खूप लोकं आयुष्यात आणलीस, नको ती लोकं तूच बाजूला सारलीस... जाता जाता 'कलर्स मराठी' या वाहिनीच्या 'हेड ऑफ प्रोग्रामिंग' याचं आव्हान देऊन गेलास... २०२३ तुझा मी ऋणी आहे. फक्त एकच विनंती... निघाला आहेस तर तुझ्या २०२४ या मित्राला अशीच मला साथ द्यायला सांग! खूप चांगलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या कलाकृती सादर करण्याचं मानस आहे. तो तडीस नेण्यासाठी त्याची सोबत लागेल!'

या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केदार शिंदे यांनी २०२३ या वर्षाला भावनिक साद घातली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये '२०२३ चा आज शेवटचा दिवस.' असं लिहिलं आहे. केदार शिंदे यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स करत नव वर्षाच्या आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या केदार शिंदे यांच्या 'महाराष्ट्र शाहीर' आणि 'बाईपण भारी देवा' या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. ऐवढचं नाही तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT