Circuitt Trailer Out
Circuitt Trailer Out Instagram
मनोरंजन बातम्या

Circuitt Trailer Out: हृता- वैभवचा हाय व्होल्टेज ड्रामा; भय, थरार आणि दहशत करणाऱ्या ‘सर्किट’चा थ्रिलर ट्रेलर रिलीज

Chetan Bodke

Circuitt Trailer News: हाय व्होल्टेज ड्रामा आणि रोमान्स असलेल्या सर्किट या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीजरमधून निर्माण झालेली उत्सुकता आता ट्रेलरमधून शिगेला पोहोचली असून, "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय.

आतापर्यंत टीझरमध्ये वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी यांची भूमिका आपल्याला पहायला मिळाली होती आणि आता ट्रेलरमध्ये अभिनेते मिलिंद शिंदे यांची दमदार एंट्री झाली आहे.

वैभवनं या चित्रपटातील भूमिकेसाठी मेहनत घेऊन सिक्स पॅक बॉडी केली आहे. या लुकचं खूप कौतुकही झालं आहे. पण वैभवच्या या सिक्स पॅक लुकचं महत्त्व चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे रोमान्स आणि तगडी अॅक्शन या चित्रपटात आहे.

सतत वैतागणाऱ्या, चिडणाऱ्या तरुणाची गोष्ट या चित्रपटात असल्याचं ट्रेलरमधून कळतं. पण तो असा का आहे? त्याच्यावर सतत मारधार करण्याची वेळ का येते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष चित्रपटातच मिळतील. त्यामुळे आता केवळ काहीच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. ७ एप्रिलला "सर्किट" सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

MS Dhoni- Daryl Mitchell: डॅरील मिचेलने धावत २ धावा पूर्ण केल्या, पण धोनीने स्ट्राईक सोडली नाही - Video

Ghati Hospital : घाटी रुग्णालयातील नर्सेसचे काम बंद; मनुष्यबळ वाढविण्याची मागणी 

Hingoli Krushi Utpanna Bazar Samiti : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिंगाेलीत आठवड्यातून पाच दिवस हळद खरेदी सुरू करणार

Gallbladder Stone : पित्त खड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग; वेदना कायमच्या दूर करण्यासाठी ५ रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT