Emraan Hashmi Family: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या अनेक पिढ्या सिनेसृष्टीत क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनेता इमरान हाश्मी हा त्यांच्यापैकी एक आहे. इमरानच्या कुटुंबाततील इम्रानच केवळ मोठ्या पडद्यावर झळका आहे असे नाही. त्याची आजी आणि वडिलांनीही या इंडस्ट्रीत काम केले आहे, पण हे फार कमी लोकांना माहीत आहे. आज इमरान हाश्मीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या कुटुंबाविषयी आणि सिनेसृष्टीतील त्याच्या नात्यांविषयी.
इमरान हाश्मीच्या आजीचे नाव पौर्णिमा होते. पण तिचे खरे नाव मेहेरबानो मोहम्मद अली होते. 1950 च्या दशकातील त्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. इतकेच नाही तर इमरानच्या आजीने 1973 मध्ये आलेल्या जंजीर चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. तर इमरान हाश्मीने 2019 मध्ये 'चेहरे' चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत काम केले आहे.
इमरान हाश्मीच्या आजीने राजेश खन्नासोबत देखील काम केले आहे. त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले, त्यांचा शेवटचा चित्रपट 'नाम' हा होता. ज्यामध्ये ती संजय दत्तच्या आजीच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय 'पतंग', 'जोगन', 'बादल', 'जल', 'औरत' या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केले.
इमरान हाश्मीचे आजोबा सय्यद शौकत हाश्मी फाळणीनंतर पाकिस्तानात गेले, परंतु त्यांची आजी पूर्णिमा यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी निर्माता-दिग्दर्शक भगवान दास वर्मा यांच्याशी लग्न केले आणि नाव बदलून पूर्णिमा दास वर्मा ठेवले. पूर्णिमाची बहीण महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांची आई शिरीन मोहम्मद अली होती. म्हणूनच मुकेश भट्ट आणि महेश भट्ट इमरान हाश्मीचे मामा आहेत. तर, आलिया आणि मोहित सुरी हे त्याचे मामे भाऊ-बहीण आहेत.
इमरान हाश्मीचे वडील सय्यद अन्वर हाश्मी हे बिझनेसमन असले तरी त्यांनी 1968 मध्ये आलेल्या 'बहारों की मंझिल' या चित्रपटातही काम केले होते. तर इमरान हाश्मीच्या आई मेहराह हाश्मी गृहिणी होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.