केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा'ने २०२३ या वर्षी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत हिट चित्रपटांच्या यादीमध्ये सामील झाला. हा चित्रपट जून २०२३ मध्ये चित्रपट रिलीज झाला असून प्रेक्षकांमधली या चित्रपटाची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. चित्रपटाला मिळालेलं घवघवीत यश सेलिब्रेट करण्यासाठी निर्मात्यांकडून खास मुंबईच्या डब्यावाल्यांसाठी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
खरंतर चित्रपटाची क्रेझ जितकी रिलीज पूर्वी होती, तितकीच क्रेझ प्रदर्शनानंतरही दिसत आहे. चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी चित्रपटाची निर्माती माधुरी भोसले यांच्यातर्फे १६ डिसेंबरला मुंबईमध्ये या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंग आयोजन करण्यात आलं होतं.
स्पेशल स्क्रिनिंगला चित्रपटाचे निर्माते आणि चित्रपटाची स्टारकास्ट यावेळेस उपस्थित होते. विशेष म्हणजे मुंबईच्या डब्यावाल्यांसाठी आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून त्यांच्यासाठी स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या डब्यावाल्यांकडून स्क्रिनिंगला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
'बाईपण भारी देवा' चित्रपटानं पहिल्या आठवड्यातच बाजी मारत १२.५ कोटींचा गल्ला जमवला होता. इतकंच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसातच 'बाईपण भारी देवा'नं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. चित्रपटाने एकूण ७६.५ कोटींची कमाई केली आहे. जया, शशी, साधना, चारु, केतकी आणि पल्लवी या सहा बहिणींची कथा मराठी सिनेसृष्टीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. (Marathi Film)
चित्रपटाविषयी बोलायचे तर, जिओ स्टुडिओ निर्मित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने प्रत्येक स्त्रीला जगायलं शिकवलं आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री आहेत. माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या ३० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.