Baipan Bhari Deva Collection: सहा बहिणींचा ‘बाईपण भारी देवा’ बॉलिवूडलाही पडला भारी, लवकरच पार करणार मोठा आकडा

Baipan Bhari Deva Box Office Collection: नुकतेच चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटाच्या कमाई बाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
Baipan Bhari Deva Box Office Collection
Baipan Bhari Deva Box Office CollectionSaam Tv

Baipan Bhari Deva Box Office Collection: मल्टीस्टारर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या सहा बहिणींनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल दीड महिना उलटला असून अजूनही केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाची कायम यशस्वी घोडदौड सुरू आहे. नुकतेच चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटाच्या कमाई बाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

Baipan Bhari Deva Box Office Collection
Urfi Javed Death Threat: तुला लवकरच गोळी घालून संपवू! उर्फी जावेदला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

सहा बहिणींची कथा असलेल्या या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी चांगलच डोक्यावर घेतलं आहे. अनेक प्रेक्षकांना चित्रपटाची कथा, केदार शिंदेंचं दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटातली गाण्यांनी प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. या सर्वच गोष्टीचा आता इम्पॅक्ट निर्मात्यांना कमाईतून दिसत आहे. नुकतेच कमाईचा आकडा समोर आला असून चित्रपटाने रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाला देखील कमाईच्या मागे टाकत लवकरच १०० कोटींचा पल्ला गाठणार आहे.

Baipan Bhari Deva Box Office Collection
Pravin Tarde Got Adhik Maas Gift: प्रविण तरडेला मिळालं सासूरवाडीकडून ‘अधिकाचं वाण’, पत्नीने शेअर केला खास मानपान करतानाचा व्हिडीओ

चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “भारतमाता की जय… बाईपण भारी देवा या सिनेमाने आणखी भरारी मारली.. खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी स्वतंत्र झाली. सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि ती इतर सिनेमांनाही फायद्याची ठरली!! एक स्त्री घर चालवते तर, सिनेमा नक्कीच चालवू शकते. याची ग्वाही या सिनेमाच्या निमित्ताने दिली गेली. लवकरच ५० वा दिवस साजरा करू. सहकुटुंब सहपरिवार आता गर्दी होते आहे. पुढची वाटचाल सोपी नाही पण अवघडही नाही. कारण तुम्ही सोबत आहात. श्री स्वामी पाठीशी आहेत. आणि श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद टप्प्या टप्यावर मिळतो आहे.” सध्या केदार शिंदेंची ही पोस्ट बरीच चर्चेत आली आहे.

प्रदर्शनापासून कमाईच्या बाबतीत चित्रपटाचा आलेख चढता कायम आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दीड महिना उलटला असला तरी, चित्रपटाला अजूनही हाऊसफुल्लच्या पाट्या लागत आहेत. दरम्यान, चित्रपटाने आतापर्यंत ७६.०५ कोटींची कमाई केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com