Narendra Bandabe Social Media Post: लॉकडाऊननंतर मराठी टेलिव्हिजनसृष्टीला सुगीचे दिवस आलेय, असं म्हणालं तरी वावगं ठरणार नाही. लॉकडाऊननंतरच्या मोठ्या गॅपनंतर अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.
अशातच ‘बाईपण भारी देवा’ या महिलाकेंद्रित असलेल्या चित्रपटाचे नाव आता हिट चित्रपटांच्या यादीत देखील घेतले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदेंनी केले असून चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कलाकारांसह, चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक देखील चित्रपटाचे तोंडभरून कौतुक करत आहे. नुकतंच चित्रपटाच्या कौतुकाबद्दल पत्रकार आणि चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडबे यांनी देखील एक लांबलचक पोस्ट शेयर केली आहे.
पत्रकार आणि चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडबे यांनी महिलाकेंद्रित चित्रपटवर त्यांनी पोस्ट केली आहे. नरेंद्र बंडबे यांच्याबद्दल बोलायचे तर, ते जागतिक सिनेमांबद्दल ते मराठीमध्ये लिहितात. त्यांच्या पोस्ट या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. नरेंद्र बंडवे यांनी सोशल मीडियावर ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘झिम्मा’ या दोन्ही चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेत.
आपल्या पोस्टमध्ये पत्रकार आणि चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडबे म्हणतात, “एव्हढा काय चांगला पिच्चर नाही. 'चार दिवस सासू'ची सासू (रोहिणी हट्टंगडी) आणि 'तू चाल पुढे'मधली अश्विनी (दीपा परब)आहे त्यात. बाकीपण सिरीयलमधल्या बायका आहेत. म्हणून बघायला मज्जा आली." ८२ वर्षांच्या आईची 'बाईपण भारी देवा' (२०२३)बद्दलची ही प्रतिक्रिया. अलिकडे वेड(२०२२) नंतर हा दुसरा मराठी सिनेमा आहे, जो हाऊसफुल्ल चालतोय. इंडस्ट्रीसाठी हे खरंच चांगलं आहे.”
“दिग्दर्शक केदार शिंदेसाठी तर दिलासा आहे. आधीचा 'महाराष्ट्र शाहीर' (२०२३) सर्वप्रकारचे प्रयत्न करूनही प्रेक्षकांना खेचण्यात यशस्वी ठरला नाही. बाईपण भारी चालतोय. त्यातली मंगळागौरीची गोष्ट प्रेक्षकांना खासकरुन महिलांना थिएटरपर्यंत खेचून आणतेय.”
पुढे पोस्टमध्ये नरेंद्र बंडबे म्हणतात, “झिम्मा (२०२१)ही असाच चालला. बऱ्यापैकी गल्ला जमवला. हे यशाचं सुत्र मानलं तर महिलांसंदर्भातल्या सिनेमांना गर्दी होतेय असं समजून 'माहेरची साडी सिंड्रोम' वाढू शकतो. तो टाळता आलं म्हणजे मिळवलं.”
“एकमात्र खरं की टेलिव्हिजन सिरीयल्समधल्या दिसणाऱ्या महिला कॅरेक्टर्सनी मोठी स्क्रिनही काबिज करायला सुरुवात केलीय. टिव्हीतले कलाकार, टिपिकल मंगळागौर, महिलांची सोलो किंवा ग्रुप पिकनिक किंवा साउथ सिनेमांचे रिमेक सारखे स्टिरिओटाईप विषय मराठीत चालत असतील तर आशयघन सिनेमा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मराठीतील काही दिग्दर्शकांनी थोडी विश्रांती घ्यावी. एव्हढंच.”
आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात नरेंद्र बंडबे म्हणतात, “एक गोष्ट जाणवली ती अशी की बाईपण भारीला जाणाऱ्या प्रेक्षकांमध्ये पीयर प्रेशर आहे. थेटरात गेल्यावर तो प्रकर्षाने जाणवतो.झिम्मा आणि बाईपण मध्ये समान दुवा आहे. परिस्थितीत अडकलेली ती, तिच्या अनेक इच्छा आकांक्षांचं झालेलं दमन, आणि जिले जरा... किंवा थोडीसी जिंदगी टाईप आशावाद. हे असं का आवडतंय याचाही विचार व्हायला हवा..”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.