‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रियालिटी शोमधून घराघरामध्ये पोहचलेली आणि मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच केतकी माटेगावकरने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमुळे तिला नेटिझन्सने चांगलेच ट्रोल केले आहे. ऐवढंच नाही तर केतकीला मराठी संस्कृतीचे धडे देखील देण्यात आले आहेत.
सध्या सगळीकडे ख्रिसमस सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात केले जात आहे. बॉलिवूडपासून मराठी सेलिब्रिटी देखील ख्रिसमस सेलिब्रेश करताना दिसत आहेत. हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर फोटोंसह व्हिडिओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांना देखील शुभेच्छा देताना दिसत आहेत. नुकताच मराठीमोठी अभिनेत्री केतकी माटेगावकरने इन्स्टाग्रामवर ख्रिसमसनिमित्ताने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरून तिला ट्रोल केले जात आहे.
केतकीने इन्स्टावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ख्रिसमस ट्रीच्या शेजारी उभी राहून तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. केतकीने डोक्यावर लाल रंगाची सॅन्टाची टोपी घातली आहे. पर्पल कलरचा चेक्स क्रॉप टॉप आणि ब्ल्यू कलरची जिन्स घालून केतकीने या फोटोंमध्ये जबरदस्त पोझ दिल्या आहेत. केतकीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'Too much of holiday fever!' असे लिहिले आहे. केतकीचे हे फोटो तिच्या आईने काढले आहेत. ऐवढंच नाही तर केतकीने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये गाणं गात तिने तिच्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. एकीकडे केतकीने पोस्ट केलेल्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. २७ हजारांपेक्षा अधिक जणांनी तिच्या या फोटोंना लाइक केले आहे.
तर दुसरीकडे या फोटोंमुळे केतकीला ट्रोल देखील करण्यात आले आहे. केतकीला आपली संस्कृतीचे धडे देण्यात आले आहे. एका युजरने लिहिले की, 'हा महाराष्ट्र संतांचा 🚩आहे, Santa 🎄चा नाही' दुसऱ्या युजरने लिहिले की,'तू ऑल टाइम फेव्हरेट आहेस. पण आपली संस्कृती आणि आपले सण साजरे करा पाश्चात्य संस्कृतीचे नको.' तर आणखी एका युजरने लिहिले की, 'केतकी हे बरोबर नाही ग... आपली संस्कृती काय आपले कुळ. आपली परंपरा हे भारतीय आहे.' एकीकडे केतकीला ट्रोल केले जात असले तरी देखील तिच्या चाहत्यांनी ती आपल्या धर्माचे सण देखील साजरे करते असे म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.