Actor Prasad Oak Watch Swatantrya Veer Savarkar Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swatantrya Veer Savarkar Film: प्रसाद ओकने पाहिला रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट, पोस्ट करत केला कौतुकाचा वर्षाव

Swatantrya Veer Savarkar Film Review: मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Actor Prasad Oak Watch Swatantrya Veer Savarkar Film

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) स्टारर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाला (Swatantrya Veer Savarkar Movie) प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट रिलीज होऊन आज १० दिवस झालेले आहेत.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत रिलीज झालेला आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

नुकतंच मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडेचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता प्रसाद ओकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटासंदर्भात पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “ “स्वातंत्र्यवीर सावरकर” अप्रतिम चित्रपट…!!! अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी. अतिशय संयत अभिनय. उत्तम पटकथा. देखणं छायाचित्रण. परिणामकारी पार्श्वसंगीत. रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन…!!! चित्रपट आता “मराठीत” सुद्धा प्रदर्शित झाला आहे. आमचे मित्र सुबोध भावे यांनी सावरकरांना आवाज दिलेला आहे. कोणत्याही खोट्या पोस्ट्सकडे लक्ष देऊ नका. चित्रपट उत्तम प्रतिसादात चालू आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा “सावरकरांना” त्रिवार वंदन…!!!! ” या पोस्टद्वारे प्रसाद ओकने चित्रपटासोबत रणदीप हुड्डाच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे. त्यासोबतच प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचेही आवाहन केले आहे.

प्रसाद ओकच्या या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘’ ‘खूपच सुंदर रणदीप हुड्डा सर, चित्रपटामध्ये खूपच तुम्ही सुंदर अभिनय केलेला आहे.’ दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'अतिउत्तम चित्रपट.' तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'खूप छान सर आपल्या सावरकरांच्या चित्रपटास सपोर्ट केल्या बद्दल... हीच अपेक्षा संपूर्ण मराठी इंडस्ट्री कडून आहे.' अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. तर सोबतच अनेकांनी प्रसाद ओकला ट्रोलही केले आहे.

दरम्यान, 'स्वातंत्रवीर सावरकर' चित्रपटामध्ये रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकारांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडेने सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अंकिता लोखंडे बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. चित्रपटाचे सह-लेखन, सह-निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनयदेखील रणदीपने केले आहे. चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने खूपच मेहनत घेतली आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण १५ कोटींच्या आसपास कमाई केलेली आहे. तर जगभरामध्येही चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT