Bharat Jadhav New Movie Poster London Misal Movie Instagram Post
मनोरंजन बातम्या

Bharat Jadhav New Movie: तिखट तर्री घालून ४४० व्होल्टचा झटका देणार ‘लंडन मिसळ’, भरत जाधव दिसणार हटक्या भूमिकेत

London Misal Movie: ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाच्या माध्यमातून भरत जाधव फार मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Chetan Bodke

London Misal Movie

सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘लंडन मिसळ’ चित्रपटाची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाच्या माध्यमातून भरत जाधव फार मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच या चित्रपटामध्ये भरत जाधव यांनी रॅप गायले आहे.

चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत भरत जाधव, ऋतुजा बागवे, रितीका श्रोत्री, गौरव मोरे, माधुरी पवार, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनिल गोडबोले अशी दमदार स्टारकास्ट दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दुर राहिलेले भरत जाधव या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. नाटक असो किंवा चित्रपट कायमच आपल्या दर्जेदार अभिनयामुळे भरत जाधव चर्चेत असतात. येत्या काही दिवसातच भरत जाधव या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करत असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता दिसतेय.

कथेबद्दल सांगायचे तर, या चित्रपटामध्ये आदिती आणि रावी या दोन सख्ख्या बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. या दोन्हीही बहिणी लंडनमध्ये राहत असतात. लंडनमध्ये राहणाऱ्या या दोघी सख्ख्या बहिणी आपल्या वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिथे राहत असतात. तिथे त्यांना अनेक अडी- अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागतो, त्याची कथा म्हणजे ‘लंडन मिसळ’ होय. नाटक, अभिनय, म्युझिक, डान्स, पोट धरून हसवणारा विनोद आणि झणझणीत मिसळ याचा मिलाप चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. (Entertainment News)

जालिंदर गंगाराम कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाची भारतात आणि लंडनमध्ये शूटिंग झाली आहे. भरत जाधव खूप मोठ्या ब्रेकनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार असल्याने प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे. भरत जाधव यांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी रॅप सॉंग गायलं आहे. कायमच अभिनयात श्रेष्ठ असलेल्या भरत जाधव यांची नवी भूमिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT