Tanushree Dutta-Nana Patekar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tanushree Dutta: मराठी माणूस गुन्हेगार असला तरी पोलिसांकडून संरक्षण, तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर गंभीर आरोप

Tanushree Dutta Criticized Nana Patekar: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०१८ पासून मला त्रास दिला जात आहे. कुणी तरी सतत माझा पाठलाग करत असल्याचे तनुश्रीने सांगितले.

Priya More

Summary :

  • तनुश्री दत्ताचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

  • नाना पाटेकर गँगस्टर कुटुंबातून आले असल्याचा गंभीर आरोप

  • पोलिस आणि राजकीय लोकांकडून मराठी गुन्हेगारांना संरक्षण मिळत असल्याची टीका

  • 'मीटू'नंतरही छळ थांबला नाही; सुशांतप्रमाणेच छळाचा अनुभव असल्याचे वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तनुश्री दत्ताने मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये रडत रडत तनुश्री दत्ताने मुंबईत मला त्रास दिला जात असल्याचे सांगितले. तनुश्री दत्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तनुश्रीने पुन्हा एकदा अभिनेता नाना पाटेकर आणि बॉलिवूडवर गंभीर आरोप केले आहेत. ऐवढच नाही तर तनुश्री दत्ताने मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बॉलिवूडमध्ये MeToo चळवळ सुरू करणाऱ्या तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर आरोप करताना ते गँगस्टर कुटुंबातून आले असल्याचा आरोप केला आहे. 'मराठी माणूस गुन्हेगार असला तरी पोलिसांकडून त्याला संरक्षण दिले जाते. बॉलिवूडमध्ये माफिया गँग बसली आहे. सुशांतसिंह राजपूतसोबत जे झालं ते सर्व आता माझ्यासोबत होत आहे.' असा आरोप तनुश्री दत्ताने केला. तिने केलेल्या गंभीर आरोपामुळे ८ वर्षांनंतर पुन्हा एकदा तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद उफाळून आला आहे.

तनुश्री दत्ताने आरोप केला की, '२०१८ नंतरच माझा छळ सुरू झाला. बॉलिवूडमध्ये माफिया गँग बसली आहे. नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया गँग छळामागे आहे. नाना पाटेकर गँगस्टर कुटुंबातून आले आहेत. अभिनेता नसतो तर गँगस्टर झालो असतो असे नाना पाटेकर म्हणायचे. मुंबईत मला त्रास होत आहे. माझा पाठलाग केला जात आहे. प्रत्येक वेळी वेगळी व्यक्ती माझा पाटलाग करते. अनेकांचे बुरखे मी फाडले त्यामुळे मला त्रास दिला गेला. सुशांतसिंह राजपूतसोबत जे झालं ते सर्व माझ्यासोबत होत आहे. सूशांतप्रमाणेच माझाही छळ केला जात आहे.'

तनुश्रीने नाना पाटेकरांवर आरोप करताना पुढे सांगितले की, 'मीटूची केस मी केली होती. हैवान असलेल्या लोकांचा इगो खूप मोठा असतो. त्यांचा बुरखा फाडल्यानंतर अहंकार आणि इगो यांच्यासाठी मोठा होता. त्यांना समोरच्यांना उद्धवस्त करायचं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला पण तक्रारीचा काहीच उपयोग नाही झाला. मराठी माणूस गुन्हेगार असला तरी त्याला पोलिसांचे संरक्षण मिळतं. बाहेरचा माणूस मेला तरी चालेल. पण पोलिसांचा सपोर्ट फक्त त्यांनाच होतो. मंत्र्यांचाही त्यांना सपोर्ट मिळाला. त्यामुळे मला वारंवार त्रास दिला जातोय.'

'नाना पटेकर मोठा अभिनेता नाही. तो फक्त कागदावरचा अभिनेता आहे. २००८ मध्ये नाना पाटेकर यांच्याकडे एकही चित्रपट नव्हता. प्रोड्युसर, डायरेक्टर माझ्याकडे काम कर म्हणून भीक मागत आले होते. मी काम केले तर चित्रपट चालेल, असे ते म्हणाले होते. नाना पाटेकर इतके मोठे अभिनेते असते तर मला चित्रपटात घ्यायची गरज नव्हती. २००८ मध्ये नाना पाटेकरांपेक्षा मी मोठी अभिनेत्री आणि स्टार होती. माझ्या स्टारडमचा वापर करत त्यांनी आपलं करिअर वाचवण्याचा फायदा केला.'

तनुश्री दत्ताने पुन्हा कोणावर आरोप केले आहेत?

तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तनुश्री दत्ताने पोलिसांबद्दल काय म्हटले?

तनुश्री म्हणाली की, "मराठी माणूस गुन्हेगार असला तरी त्याला पोलिसांचे संरक्षण मिळते."

व्हिडीओमध्ये तिने कोणत्या भावना व्यक्त केल्या?

तिने रडत रडत सांगितले की, मुंबईत सतत तिचा छळ केला जात आहे.

ती सुशांत सिंह राजपूतशी तुलना का करते आहे?

ती म्हणते की, "सुशांतसोबत जे झालं, तेच आता माझ्यासोबत होत आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT