ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे फक्त यशस्वी अभिनेत्री आणि क्रिकेटपटूच नाही, तर त्यांच्या स्टाईल, केमिस्ट्री आणि सहज सुंदरतेमुळे चाहत्यांचे लाडके कपल ठरले आहेत.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस हे एक ग्लोबल पॉवर कपल आहेत. दोघांचे वेगवेगळे कलात्मक क्षेत्रातील यश आणि एकमेकांवरील प्रेम जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
रितेश आणि जेनेलिया बॉलिवूडमधील सर्वात प्रिय कपल आहेत. एकमेकांप्रतीचा आदर, प्रेम आणि सौम्य स्वभावामुळे हे कपल नेहमीच चाहत्यांच्या मनात घर करून राहतात.
आलिया आणि रणबीर बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आहे. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री जितकी जबरदस्त आहे, तितकीच रिअल लाइफमध्ये त्यांची बॉन्डिंगही खास आहे.
सिद्धार्थ आणि कियारा हे बॉलिवूडमधील चाहत्यांचं मन जिंकणारं नवं कपल आहे. त्यांची रिअल आणि रील केमिस्ट्री सगळ्यांना आवडते.
विकी आणि कटरिना हे दोघंही त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, पण त्यांच्या प्रेमकथेची गोड सफर आणि शांत जीवनशैलीमुळे ते बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत असतात.
दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडमधील सर्वात चार्मिंग आणि एनर्जेटिक कपल्सपैकी एक आहे.