Umesh-Priya  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Umesh Kamat आणि Priya Bapat साठी नववर्ष ठरलं खास, घरी नव्या पाहुण्याचं आगमन; दणक्यात केलं स्वागत, पाहा VIDEO

Umesh Kamat-Priya Bapat Video : मराठी लोकप्रिय जोडपे उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी एका खास पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. उमेश आणि प्रियाच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. खास क्षणांचा व्हिडीओ पाहा.

Shreya Maskar

नवीन वर्षाची सुरुवात होऊन आज सात दिवस झाले आहे. नवीन वर्ष अनेकांसाठी खूप खास ठरले. यात मनोरंजन सृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश आहे. नवीन वर्षाच्या सात दिवसातच काही कलाकार लग्नबंधनात अडकले तर काहींनी आपल्या नात्याचा खुलासा केला. अनेकांनी नवीन घर घेतले तर काहींच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे.

आनंदाच्या वातावरणात आता मराठी अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat ) गुडन्यूज दिली आहे. त्यांच्या घरी एका सदस्याचे आगमन झाले आहे. उमेशने सोशल मीडियावर पोस्ट करूनही आनंदाची बातमी चाहत्यांन दिली आहे. उमेशने नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत करून नवीन बाईकचे आगमन केले आहे. नवीन वर्षात उमेश कामतने नवी कोरी बाईक खरेदी केली आहे.

उमेशने बाईक खरेदी करताना गेल्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने या व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "पहिला मिनी व्लॉग हा असावा....माझे पहिले प्रेम आयुष्यात परत आले आहे... भाई (संकेत अविनाश कोर्लेकर) लव्ह यू... आणि अर्थातच बायको आजची व्हिडिओग्राफर प्रिया बापट..." त्याच्या या व्हिडीओवर अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

उमेश कामत आणि प्रिया बापट प्रेक्षकांचे लाडके जोडपे आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, नाटक, वेब सिरीज आणि सिनेमांमध्ये त्याने काम केले आहे. या दोघांची 'आणि काय हवं?' ही वेब सिरीज खूप गाजली होती. यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. कायम एकमेकांना प्रोत्साहन करताना हे जोडपे पाहायला मिळते. आता नवीन बाईकने उमेश-प्रिया फिरायला जाणार हे आपल्याला लवकरच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मासिक पेन्शनबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Ladki Bahin Yojana : सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”; पुरंदरच्या पाहणी दौऱ्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Palak Besan Chilla Recipe: रोज सकाळी नाश्त्यासाठी बनवा हेल्दी पालक बेसन चीला, वाचा सोपी रेसिपी

Health Tips: बर्फ खाण्याची इच्छा ते हात-पायांना सतत मुंग्या येतात? मग, शरीराचे 'हे' ७ संकेत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT