Shreya Bugade Trolled Saam TV
मनोरंजन बातम्या

Chala Hawa Yeu Dya: 'कोट चांगला आहे. पण तुझ्या पेक्षा...' सागर कारंडेची जागा श्रेया बुगडेने घेताच नेटकऱ्यांचा संताप

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातून विनोदवीर सागर कारंडेने एक्झिट घेतली असून श्रेया बुगडेने त्याची पोस्टमन काकांची जागा घेतली आहे.

Chetan Bodke

Shreya Bugade Trolled: अवघ्या महाराष्ट्राला आपल्या खास विनोदशैलीने 'चला हवा येऊ द्या'ची टीम सर्वांनाच नेहमी हसवत असते. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराची ओळख आपल्या चाहत्यांमध्ये खास आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे सागर कारंडे. सागर कारंडेने या कार्यक्रमातून चाहत्यांमध्ये विशेष ओळख निर्माण केली. आजवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागरने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर त्याने 'चला हवा येऊ द्या' या बहुचर्चित कार्यक्रमाला रामराम केल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षक नाराज झाले.

या कार्यक्रमात सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तर कधी पोस्टमन काका बनून रडवलं. मात्र आता सागर या कार्यक्रमात पोस्टमन काका म्हणून दिसणार नाही. या कार्यक्रमात सागरची जागा अभिनेत्री श्रेया बुगडेने घेतली आहे.

या आठवड्यात श्रेयाने पत्राचं वाचन केलं. श्रेयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पत्र वाचतानाचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पण श्रेयाने वाचलेले हे पत्र कदाचित नेटकऱ्यांना पटलेलं दिसत नाही. तिच्या या व्हिडिओ नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी तिला नेटकरी म्हणतात, "सागरच्या आवाजात जी जादू आहे, तशी जादू श्रेयाच्या आवाजात नाही. आम्हाला पोस्टमन म्हणून सागरच हवा.", तर आणखी एक युजर म्हणतो, "सागर कारंडेच्या आवाजात असतं तर आणखीनच छान वाटलं असतं", "श्रेया सागर कारंडे तुझ्या पेक्षा चांगल्या आवाजात वाचतात आणि ते फक्त सागरलाच जमतं." असं म्हणत त्या नेटकऱ्याने श्रेयाची फिरकी घेतली. पुढचा युजर कमेंट करत म्हणतो, " खूप छान, मोटिवेशन कोट चांगला होता. पण तुझ्या पेक्षा सागरला चांगलं जमतं."

सागरने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली असून काही भागांत तो दिसून आला होता. आता त्याने पूर्णपणे हा कार्यक्रम सोडला असून त्याची जागा श्रेया बुगडेने घेतली असल्याचे म्हटले जात आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, 'चला हवा येऊ द्या'मधील सर्वच विनोदवीर 'पत्र वाचन' हा सेगमेंट करणार आहेत. अद्याप सागरकडून शो सोडला असल्याची माहिती मिळाली नसून त्याने अद्याप मौन बाळगले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती,नागपूर महामार्गावरील अमरावती जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप बंद

Crime News: शिक्षिकेकडे शाळा ट्रस्टीच्या मुलानं केली शरीरसुखाची मागणी; आधी पाठवला अश्लील व्हिडिओ नंतर...

आता गावाकडची खरात फाइल्स उघडली! गावकऱ्यांनी सांगितले भोंदूबाबाचे एकेक हादरवणारे कारनामे

Pune Historic Places : धुक्यात हरवलेला किल्ला; घनदाट जंगलातून करा रोमांचक ट्रेक, पुण्यात लपलंय 'हे' ठिकाण

Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात आमदाराची बायको, ती कोण? चर्चेनं महाराष्ट्रात खळबळ

SCROLL FOR NEXT