Ranbir Kapoor: 'तुझी लेक नक्की कोणा सारखी दिसते?' रणबीरच्या उत्तरानं सर्वांचीच बोलती बंद

शोमध्ये कपिलने रणबीरला 'तुझी लेक नक्की कोणा सारखी दिसते?' असा सवाल विचारला.
Ranbir Kapoor On Her Daughter Raha
Ranbir Kapoor On Her Daughter RahaSaam Tv

Ranbir Kapoor On Her Daughter Raha: लोकप्रिय कॉमेडी रिॲलिटी शो, 'द कपिल शर्मा शो' मध्ये येणारे सर्वच सेलिब्रिटी नेहमीच चर्चेत असतात. कपिल शर्माच्या या कार्यक्रमाने सर्वांचेच मन जिंकले आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पुढच्या प्रोजेक्ट्सचे प्रमोशन करण्यासाठी या मजेदार शोमध्ये सहभाग घेतला आहे. आता 'तू झूठी मैं मक्कर'मध्ये श्रद्धा कपूर, रणबीर कपूर आणि अनुभव सिंग बस्सी 'द कपिल शर्मा शो'मध्ये आले होते.

नुकताच शोचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच, "रणबीर, तुझ्या शेजारचे येऊन तुझ्या मुलीला पाहून बोलत असतील की, ही मुलगी कोणावर गेलीय ?, आलियावर गेली का?" तर यावर रणबीर म्हणतो, "आम्हीच याचा नेहमी विचार करतो. तिचा कधी चेहरा माझ्यासारखा तर कधी आलिया सारखा दिसतो." या रणबीरच्या वाक्याने सर्वांनाच चकित केले आहे.

पुढे कपिल म्हणतो, "जेव्हा अनुभव बस्सी आमच्या शोमध्ये स्टँड-अप कॉमेडियन म्हणून आला होता, पण आज तो एक अभिनेता म्हणून आला आहे. पण तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा की नका ठेवू, आमच्या शोमध्ये आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींचे नशीब बदलते? कपिलच्या या वाक्यावर सर्वच पोट धरुन हसले.

यानंतर कपिल श्रद्धाला म्हणतो, "श्रद्धा, तो तुझी स्तुती करत होता, म्हणतो की, श्रद्धा जी किती सुंदर दिसत आहे." अनुभव म्हणतो, "कसाटा आईस्क्रिम सारखी फुल्ल टू कलरफुल दिसत होती."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com