आज लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.
मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाची झलक पाहा.
कलाकारांनी गणपतीचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
आज (27 ऑगस्ट) जगभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. सर्वत्र वाजत गाजत लाडक्या बाप्पांचे आगमन होत आहे. मनोरंजनसृष्टीतही गणपतीची धुमधाम पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. ज्याचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहे. मराठी कलाकरांच्या घरच्या गणपती बाप्पाचे सुंदर व्हिडीओ पाहा.
मराठी लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपतीच्या आगमन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रूपाली भोसले आता 'लपंडाव' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने देखील ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले आहे.
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरच्या घरी सुंदर गणरायाचे आगमन झाले आहे. तिच्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी गणपती येतो.
'आई कुठे काय करते' फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी बाप्पाचे घरी स्वागत केले आहे. बाप्पाची सुरेख मूर्ती पाहा.
महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीने स्वतःच्या हाताने सुंदर गणपतीची मूर्ती तयार केली आहे. खास व्हिडीओ पाहा.
'लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेता विवेक सांगळेच्या घरी गणपती आला आहे. अलिकडेच त्याने नवीन घर घेतले आहे.
महाराष्ट्राची चंद्रा अमृता खानविलकरच्या घरचा छोटा गणोबा पाहा. डोळ्यांचे पारणे फेडणारी गणपतीची मूर्ती आहे.
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या नाशिकमधील घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे अगदी सुरुवातीपासून सायली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते. यंदाही तिने अतिशय साध्या पद्धतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी सायली स्वतः आपल्या हाताने घरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करते. यंदाही सायलीने पहाटे ब्रह्म मुहूर्तावर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने लवकरच नव्या धाटणीच्या सिनेमा आणि भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे तिने सांगितले आहे.
सुबोध भावे यांच्या घरी गणपती आला आहे. सुबोध भावे यांच्या पुण्यातील घरी लाडक्या गणरायाचे स्वागत झाले आहे. भावे कुटुंबियांनी विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली गेली. स्वतः सुबोध भावे आणि त्यांच्या मुलांनी बाप्पासाठी एक छोटा देखावा तयार केला आहे. दर वर्षी सुबोध भावे हे त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.