Shreyas Talpade Took Darshan Dagdusheth Ganapati Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade In Dagadu Sheth Ganpati: दगडूशेठला जाताना रस्ता भरकटला, बाप्पाच्या रुपात धावून आला ट्राफिक पोलीस; श्रेयस तळपदेने सांगितला अनुभव

Shreyas Talpade News: काल दगडुशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे गेला होता. दर्शनाला जातानाचा किस्सा अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Chetan Bodke

Shreyas Talpade Took Darshan Dagdusheth Ganapati

सध्या अनेक सेलिब्रिटी मुंबई, पुण्यासह अनेक वेगवेगळ्या शहरात गणरायाच्या दर्शनाला जाताना दिसत आहे. पुण्याच्या मानाच्या गणपतीला अनेक सेलिब्रिटी जाताना दिसत आहेत. त्यातील एक गणपती बाप्पा म्हणजे दगडुशेठ हलवाई बाप्पा... पुण्याच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या या गणरायाच्या दर्शनाला सामान्या नागरिकांसह अनेक सेलिब्रिटी मंडळीही जाताना दिसतात. नुकताच काल दगडुशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे गेला होता. दर्शनाला जातानाचा किस्सा अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अभिनेता श्रेयस तळपदे कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. यावेळी अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने ट्राफिक पोलिसांचे आभार मानले आहेत, त्याच्यासोबत नेमका काय किस्सा घडलाय त्याने पोस्टमध्ये चाहत्यांसोबत शेअर केला आहे. श्रेयस तळपदे आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “देव आपल्याला कोणत्याही मार्गाने अथवा रुपाने भेटतो, आज तो मला बापू वाघमोडे यांच्या रूपात भेटला.”

श्रेयस तळपदे आपल्या पोस्टमध्ये पुढे सांगतो, “दगडू शेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाताना आम्ही वाटेतच रस्ता चुकलो होतो. चुकलेली वाट दाखवण्यासाठी आमच्याकडे बापू वाघमोडे आले आणि त्यांना रस्ता समजावून सांगितला. ट्राफिक हवलदार यांनी आम्हाला त्यांच्या बाईकवरुन रस्ता सांगितला. आम्ही बाप्पाच्या दर्शनाला वेळेत कसे पोहोचू, यासाठी बापू वाघमोडे यांनी फार प्रयत्न केले. धन्यवाद साहेब...”

आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात श्रेयस तळपदे म्हणतो, “देव कायमच आपल्या आजुबाजुलाच असतो. याचा फक्त आपल्याला भास व्हायला हवा. आणि मला तो काल भास झाला. आपल्या समोर कोणत्या रुपात देव येतो, हे फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ते आम्हाला भेटले, त्यांनी आम्हाला मदत केली, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले, आमच्यासोबत संवाद केला. आपल्यासोबत बोलणारा हा देव आहे, याची प्रचिती होणे, आवश्यक आहे. कायमच आपण प्रत्येकासोबत अत्यंत आदराने वागायला हवे, कारण कधी कोणत्या रुपात आपल्याला देव भेटेल सांगू शकत नाही. गणपती बाप्पा मोरया...”

श्रेयसच्या ह्या पोस्टवर खुद्द ट्राफिक पोलिस बापु वाघमोडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. कमेंट करत बापु वाघमोडे म्हणाले, “दादा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. माझा फोटो पोस्ट केल्याबदल धन्यवाद. तेव्हा मला तुमच्याशी बोलताना सुचलं नाही की आम्ही दोघे नवरा बायको तुमचे big fan आहे, म्हणून आम्ही आमच्या मुलाचे नाव पण तुमच्या नावावरूनच ठेवले आहे... Shreyash bapu waghmode जय हिंद...”

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT