Vandana Gupte Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vandana Gupte: पावसाच्या पाण्यात पाय घसरून पडले...; वंदना गुप्तेंच्या पायाला झाली दुखापत मागितली प्रेक्षकांची माफी, म्हणाल्या...

Vandana Gupte Video: ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अलीकडेच पावसाच्या पाण्यात पाय घसरून पडल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. त्यांनी स्वतःने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून आपल्या तब्येतीची माहिती दिली.

Shruti Vilas Kadam

Vandana Gupte Video: ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अलीकडेच पावसाच्या पाण्यात पाय घसरून पडल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. तिनी स्वतःने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून आपल्या तब्येतीची माहिती दिली. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की त्यांना चालताना त्यांना भयंकर त्रास होत आहे. तरीही त्यांनी प्रेक्षकांची एका खास कारणामुळे माफी मागितली.

वंदना गुप्ते यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना त्यांच्या 'कुटुंब कीर्रतन' या नाटकाचे प्रयोग रद्द करावे लागत आहेत. विशेषत: त्यांचं लोकप्रिय नाटक ‘कुटुंब कीर्रतन’चे पुण्यात १८ ऑगस्ट रोजी बालगंधर्व नाट्यगृहात होणारा प्रयोग आणि १९ ऑगस्ट रोजी बोरिवली येथे होणारा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. या गोष्टीचं त्यांना दुख झालं असून याबद्दल त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

हा निर्णय जाहीर करताना वंदना गुप्ते खूप भावूक झाल्या होत्या. त्यांनी चाहत्यांची माफी मागताना म्हटले की, “ही गोष्ट माझ्यासाठी खूप दुःखदायक आहे, मी माझ्या सर्व प्रेक्षकांना सॉरी म्हणते. पायाला दुखापत झाली यापेक्षा नाटकाचे प्रयोग रद्द झाल्याचे मला जात दुख आहे.” त्यांच्या या व्हिडीओमध्ये त्यांचा नातू रियानदेखील दिसतो, जो त्याचा आजीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देताना दिसला.

वंदना गुप्ते यांच्या दुखापतीमुळे प्रेक्षक निराश झाले असले तरी सोशल मीडियावर त्यांना लवकरच बरं वाटू दे अशा कमेंट करत शुभ आशिर्वाद देत आहेत. रंगभूमीवरील त्यांच्या ‘कुटुंब कीर्रतन’ या नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात त्यांच्यासोबत तन्वी मुंडले व संकर्षण कऱ्हाडे यांची मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT