Tejashri Pradhan Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tejashri Pradhan Post: 'जाणीव आहे त्या अश्रूच्या थेंबाची', असं का म्हणाली तेजश्री प्रधान?; पोस्ट होतेय व्हायरल

Pramachi Gost Serial: नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन ऐवढं मोठं यश मिळाल्याबद्दल अभिनेत्री तेजश्री प्रधानने खास पोस्ट केली आहे.

Priya More

Tejashri Pradhan Insta Post:

नुकताच मराठी मालिकांचा (Marathi Serial) टीआरपी समोर आला. या मालिकांचे २ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२३ चे टीआरपी रेटिंग आकडे पाहता नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gost) ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही मालिका आघाडीवर आहे. या दोन्ही मालिकांनी इतर सर्व प्रसिद्ध मालिकांना मागे टाकले.

नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन ऐवढं मोठं यश मिळाल्याबद्दल अभिनेत्री तेजश्री प्रधानने खास पोस्ट केली आहे. तेजश्री प्रधानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आज थोडं व्यक्त व्हावसं वाटलं...', असा फोटो पोस्ट करत तिने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहे. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान मुक्ता हे पात्र साकारत आहे. तिच्या या भूमिकेला अल्पावधितच प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

तेजश्रीने इन्स्टा पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'कसे आणि कुठल्या शब्दात आभार मानू? तब्बल अडीच वर्षानंतर टेलिव्हिजनवर पुन्हा परतल्ये. तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि पटकन म्हणतं “आम्हाला तू आमच्या घरातलीचं वाटतेस टिव्हीमधे पाहिल्यावर. 'तेचं आपलं घरातलं माणूस अडीचं वर्षानंतर परत यावं. आपण त्याच्या गेल्या दिवसापासून परत येण्याच्या वाटेवर डोळे ठेवून रहावं, आणि घरी परतलेल्या “त्या” माणसाला तुमचे ते वाट पाहणारे डोळे पाहून भरूनचं यावं. तसचं काहीस माझ्या मनाचं झालयं, आज पहिल्या भागाला (episode ला) तुम्ही दिलेला प्रतिसाद कळल्यानंतर.'

तेजश्रीने पोस्टमध्ये पुढे असे सांगितले आहे की, 'इतकी वर्षे कामावर श्रद्धा ठेवून सातत्याने तुमच्या समोर येत राहीले. पडले, धडपडले, पुन्हा उठले. आधाराला फक्त काम होतं. शाश्वत फक्त काम होतं, इतकी वर्षे त्याच कामाने मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही. आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाचं. सांगावसं वाटलं.'

तसंच, “मला जाणीव आहे तुमच्या आयुष्यातल्या ‘त्या’ अर्ध्या तासाची, जो तुम्ही माझ्या नावावर करता, जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मियतेची आणि नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या ‘त्या’ अश्रुच्या थेंबाची.. जो कधी लक्ष्मी सीठी, कधी जान्हवी साठी, कधी शुभ्रासाठी आणि आता मुक्ता साठी ढळतो.. “आणि हिचं जाणीव सातत्याने पोटतिडकीने काम करण्याचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे. या पुढे ही देत राहील. पुन्हा एकदा … मनापासून आभार. असंच कायम माझ्या पाठीशी रहा. बाकी #HappyLife आहेचं' असं तेजश्रीने म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री तेजश्री प्रधान 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधानने साकारलेली 'जान्हवी' ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेनंतर तेजश्रीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. तेजश्री नुकताच प्रेक्षकांच्या भेटाला आलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमध्ये मुक्ताची भूमिका साकारत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT