Kasara Movie Poster Launch Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kasara Movie: शेतीप्रधान विषयावरील 'कासरा'चं पोस्टर आऊट, स्मिता तांबे दिसणार मुख्य भूमिकेत

Kasara Movie Poster Launch: मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे देखील नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. स्मिता तांबे (Smita Tambe) कासरा चित्रपटाच्या (Kasara Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

Smita Tambe Movie:

मराठी सिनेरसिकांसाठी यंदाचे वर्ष खूपच चांगले आहे. या वर्षामध्ये प्रेक्षकांना मनोरंजना खास तडका मिळणार आहे. कारण या वर्षामध्ये अनेक चांगल्या धाटणीचे आणि जबरदस्त कंटेट असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्याचसोबत अनेक चित्रपटांची घोषणा झाली, तर काही चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अशामध्ये आता मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे देखील नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. स्मिता तांबे (Smita Tambe) कासरा चित्रपटाच्या (Kasara Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शेतीप्रधान असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा दणक्यात पार पडला. हा चित्रपट येत्या ३ मे ला प्रदर्शित होणार आहे.

रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्सनं 'कासरा' चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. दिग्दर्शक म्हणून कासरा हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. रवी नागपूरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा, संवादलेखन केले आहे. तर अविनाश सातोसकर यांनी या चित्रपटाचे छायांकन केले आहे. प्रशांत नाकती यांनी लिहिलेल्या गीतांना प्रशांत नाकती, संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील गाणी जावेद अली, आदर्श शिंदे, आर्या आंबेकर, सोनाली सोनवणे, मनीष राजगिरे, रविंद्र खोमणे आणि रिषभ साठे यांनी गायली आहेत.

या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह अभिनेते गणेश यादव, प्रकाश धोत्रे, राम पवार, वंदना पटेल, कुणाल सुमन, देवेंद्र लुटे, विशाल अर्जुन आणि बाल कलाकार साई नागपूरे मुख्य भूमिकेत असणार आहे. जनमेजय तेलंग, तन्वी सावंत हे कलाकार या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना याबाबत उत्सुकता लागली आहे.

स्मिता तांबेनं आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटात जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. त्याच पठडीत आता 'कासरा' चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका आहे. शेतीप्रधान विषयावरील 'कासरा' हा चित्रपट अन्नदात्या शेतकऱ्याला वेगळा दृष्टिकोन देणारा आहे. शेतीतील प्रश्न मांडतानाच त्यावर उत्तर देण्याचाही प्रयत्न हा चित्रपट करतो. स्मिता तांबेसारख्या दमदार अभिनेत्रीच्या अभिनयानं या चित्रपटाचं कथानक वेगळ्या उंचीवर गेलं आहे. हा चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आयुष्याला वेगळं वळण मिळणार; 'या' राशींच्या लोकांना फायदा होणार, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Shiv Puja Niyam: शंकराच्या मंदिरातून परत येताना 'या' चुका करणं टाळा; पुजेचं फळ मिळणार नाही

Manikrao Kokate : खेळ मांडला! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देणार राजीनामा? तारीख ठरली

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

SCROLL FOR NEXT