Shivani Surve And Ajinkya Nanaware Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

रिल लाइफ कपलचं रिअल लाइफ लग्न, Shivani Surve आणि Ajinkya Nanaware अडकले विवाहबंधनात

Shivali Surve And Ajinkya Nanaware : शिवानी आणि अजिंक्य विवाहबंधनात अडकले. शाहीथाटामध्ये या कपलचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Shivani Surve And Ajinkya Nanaware Marriage:

२०२३ मध्ये अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरूवात केली. आता २०२४ हे वर्ष देखील अनेक सेलिब्रिटींसाठी खास ठरत आहे. यावर्षात देखील अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली. या यादीमध्ये आता मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांच्या नावाचा समावेश झाला आहे. नुकताच हे शिवानी आणि अजिंक्य विवाहबंधनात अडकले. शाहीथाटामध्ये या कपलचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांनी ३१ जानेवारीला गुपचूप साखरपुडा केला. त्याच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. शिवानीने देखील इस्टाग्रामवर फोटो शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर १ फेब्रुवारीला शिवानी आणि अजिंक्यने शाहीविवाह केला. त्यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण अचानक त्यांनी लग्न केल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

शिवानी आणि अजिंक्यच्या लग्नाचे, लग्नापूर्वीच्या विधीचे, हळदीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवानीच्या बिग बॉस मराठी १ मधील मित्रांनी तिच्या लग्नाला हजेरी लावली. तिच्या हळदीमध्ये डान्स करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसंच, शिवानी आणि अजिंक्यच्या लग्नाला तिच्या 'झिम्मा २' चित्रपटाच्या टीमने हजेरी लावत त्यांना शुभेच्छा दिल्या.

लग्नामध्ये शिवानी आणि अजिंक्य खूपच क्यूट दिसत होते. त्यांचा हटके लूक सर्वांना प्रचंड आवडला. शिवानी आणि अजिंक्यने लग्नामध्ये एकसारखीच ड्रेसिंग केली होती. शिवानीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घातलेली शिवानी नववधूच्या रुपामध्ये खूपच आकर्षक दिसत होती. तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा शेरवानी सूट आणि फेटा बांधला होता. तो देखील या लूकमध्ये हँडसम दिसत होता.

अजिंक्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. सध्या ही मालिका टीआरपी चार्टमधील आघाडीची मालिका असल्याचं दिसत आहे. तर शिवानीच्या कामाविषयी बोलायचं तर, 'वाळवी' आणि झिम्मा २' सारख्या सुपर डुपर हिट चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचे मन जिंकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT