Sridevi Prasanna Trailer Out Instagram
मनोरंजन बातम्या

Sridevi Prasanna Trailer: एकमेकांच्या वेगळेपणात आपलेपणा सापडणार ?; सई - सिद्धार्थच्या 'श्रीदेवी प्रसन्न'चा धम्माल ट्रेलर रिलीज

Sridevi Prasanna Film: सिद्धार्थ आणि सईच्या चाहत्यांना 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची नवी लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. नुकतंच या हटके लव्हस्टोरीचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे.

Chetan Bodke

Sridevi Prasanna Trailer Out

मराठी सिनेसृष्टीची 'बिनधास्त गर्ल' अर्थात अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि मराठी सिनेसृष्टीतला 'चॉकलेट बॉय' अर्थात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यांची लव्हस्टोरी रुपेरी पडद्यावर फुलणार आहे.

सिद्धार्थ आणि सईच्या चाहत्यांना त्यांची नवी लव्हस्टोरी पाहायाला मिळणार आहे. सिद्धार्थ आणि सई 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाच्या (Sridevi Prasanna Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. (Marathi Film)

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, सिद्धार्थ- सईची जोडी धम्माल करताना पाहायला मिळत आहे. एकंदरीतच श्रीदेवी ही चित्रपट वेड्या कुटुंबातील मुलगी आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही श्रीदेवीच्या नावाप्रमाणेचं अगदी फिल्मी अशी असतात. श्रीदेवीच्या कुटुंबातील सदस्यांचा लव्ह मॅरेज संकल्पनेवर दांडगा विश्वास असतो. त्यामुळे त्यांना अरेंज मॅरेजचे वावडे असते. (Marathi Actress)

तर एका सर्वसामान्य घरातील मुलगा प्रसन्न, त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा मुलगा वयात आला की त्याचं वेळेत लग्न होते की नाही?, लग्न वेळेत न झाल्यामुळे मुलगा वाया जातो की काय अशी घरातल्यांच्या मनात भीती असते. अशा वेगवेगळ्या कुटुंबातून आलेल्या श्रीदेवी आणि प्रसन्न यांची ओळख मॅट्रिमोनियल साईटवर भेट होते त्यानंतर दोघे एकमेकांना भेटतात.. या दोघांचं लग्न जुळणार का? श्रीदेवी प्रसन्न नवरा - बायको होणार का? हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. (Marathi Actors)

टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची खुप उत्सुकता आहे. चित्रपटाची निर्मिती कुमार तौरानी करणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढवे यांनी केले. चित्रपटात सई आणि सिद्धार्थ यांच्यासोबतच सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT