Rutuja Bagwe SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rutuja Bagwe : ऋतुजा बागवेची नवी इनिंग! सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?

Rutuja Bagwe New Restaurant : मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे बिझनेसवुमन झाली आहे. तिने नवीन रेस्टॉरंट उघडले आहे. रेस्टॉरंटचे लोकेशन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

ऋतुजा बागवे बिझनेसवुमन झाली आहे.

ऋतुजा बागवेने मुंबईत स्वत:चं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे.

ऋतुजाच्या नवीन रेस्टॉरंटचे उद्घाटन अभिनेता सुबोध भावे याने केले.

मराठी कलाविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मराठमोळी अभिनेत्री आता बिझनेसवुमन झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) आहे. ऋतुजा नुकतेच स्वत:चं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट करून तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

ऋतुजा बागवेच्या नवीन रेस्टॉरंटचे उद्घाटन मराठमोळा अभिनेता सुबोध भावे यांचा हातून करण्यात आले. ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर एक रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तर एक रेस्टॉरंटसोबत सुंदर फोटो टाकला आहे. या फोटोला तिने खास कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिलं आहे की, "तुम्हा सर्वांच्या प्रेमावर विश्वास ठेवून, माझ्या माणसांना घेऊन, नव्या व्यवसायात पुढचं पाऊल टाकतेय…नक्की भेट द्या..! आम्ही आदरातिथ्यासाठी वाट पाहतोय."

ऋतुजाच्या या नवीन इनिंग पाहून चाहते आणि मित्रमंडळी तिचे कौतुक करत आहे आणि नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत आहेत. ऋतुजाच्या नवीन कोऱ्या रेस्टॉरंटचे नाव 'फूडचं पाऊल' (Foodch Paool) असे आहे. हे व्हेज- नॉनव्हेज रेस्टॅारंट आहे. ऋतुजाचे नवीन रेस्टॅारंट मखवाना रोड, मरोळ, अंधेरी पूर्व येथे आहे.

ऋतुजा वर्कफ्रंट

ऋतुजाने रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याला पारंपरिक लूक केला होता. गुलाबी रंगाची सुंदर साडी तिने नेसली होती. मॅचिंग ज्वेलरी आणि केसात गुलाबाची फुल माळून तिने हा लूक पूर्ण केला होता. ऋतुजाने आजवर अनेक मालिकांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. ऋतुजाची 'नांदा सौख्यभरे' ही मराठी मालिका खूप गाजली. तिने नाटक, चित्रपट, मालिका आणि सीरिजमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ऋतुजा बागवेने कोणता व्यवसाय सुरू केला?

नवीन रेस्टॉरंट उघडले

ऋतुजा बागवेच्या नवीन रेस्टॉरंटचे नाव काय?

फूडचं पाऊल

ऋतुजा बागवेच्या नवीन रेस्टॉरंटचे लोकेशन काय?

अंधेरी, मुंबई

ऋतुजा बागवेची गाजलेली मालिका कोणती?

नांदा सौख्यभरे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyderabad Terror Threat: 26/11 सारख्या हल्ल्याचा कट,300 जण टार्गेटवर; धमकीच्या पत्राने हैदराबाद हादरलं! पोलिसांचा हाय अलर्ट

Self Reflection : जाता-येता आरशात स्वत:ला बघणारी व्यक्ती नक्की काय विचार करते? काय आहे त्यामागील मानसशास्त्र

७५ जिल्ह्यांत अचानक बत्ती गुल अन् सायरनचा टँव टँव आवाज; राज्यात खळबळ, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: विरोधकांना विदेशातून मोठी आर्थिक ताकद…मंत्री विखे यांचा मोठा आरोप

Zunka Bhakri Recipe: थंडीत रात्री जेवणासाठी करा खमंग स्वादिष्ट झुणका-भाकर, वाचा आजीची खास रेसिपी

SCROLL FOR NEXT