बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आमिर खानच्या घरी २५ आयपीएस अधिकाऱ्यांची टीम पोहोचली.
व्हिडीओमध्ये आमिर खानच्या घरातून बाहेर जाताना पोलिसांच्या गाड्या पाहायला मिळत आहे.
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान (Aamir Khan) आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या त्याच्या घराबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आमिर खानच्या घरातून बाहेर जाताना पोलिसांच्या गाड्या पाहायला मिळत आहेत. जवळपास 25 आयपीएस अधिकारी आमिर खानच्या घरी पोहचले होते. आता आयपीएस अधिकाऱ्यांची टीम आमिर खानच्या घरी का आली याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 25 आयपीएस अधिकाऱ्यांची टीम आमिर खानला भेटण्यासाठी, मिटिंगसाठी त्यांच्या वांद्रे येथील घरी गेले होते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र आमिर खानच्या टीमसोबत संपर्क साधल्यावर असे समजले की, "आम्हाला देखील काही माहित नाही. आम्ही देखील आमिर खान कडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. "
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आयपीएस अधिकाऱ्यांनी भरलेली बस आणि पोलिसांची गाडी आमिर खानच्या घराबाहेर येताना दिसत आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आमिर खान कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहीला आहे. अलिकेड त्याच्या वाढदिवसाला त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख चाहत्यांना करून दिली. त्यानंतर गौरी आणि आमिर अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. तसेच आमिर खानचा 'सितारे जमीन पर' चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे. आता चाहते आमिर खानच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.
बॉलिवूडमध्ये आमिर खानला कोणत्या नावाने ओळखले जाते?
मिस्टर परफेक्शनिस्ट
आमिर खानच्या घरी कोण आले?
२५ आयपीएस अधिकारी
आमिर खानच्या अलिकडे रिलीज झालेल्या चित्रपटाचे नाव काय?
सितारे जमीन पर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.