Priya Bapat SAAM TV
मनोरंजन बातम्या

Priya Bapat: '४२ व्या वर्षी मुलं जन्माला घालायचं...' प्रिया बापटनं ट्रोलिंग करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

Priya Bapat Talk On Pregnancy Trolling : प्रिया बापट आणि उमेश कामतला पुन्हा एकदा मुलांवरून ट्रोल करण्यात आले आहे. यावर आता प्रियाने ट्रोलिंग करणाऱ्या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. नेमकं ती काय बोलली जाणून घ्या.

Shreya Maskar

मराठीतील अनेकांच आवडत कपल अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) नेहमीच चर्चेत असतात. ही चाहत्यांची आवडती जोडी आहे. या दोघांनी अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांनी अनेक मालिका, वेब सिरीज, चित्रपट आणि नाटकात काम केले आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या लग्नाला तब्बल १३ वर्ष झाली आहेत. तरीही त्यांना मुलं नाही. यावरून अनेक वेळा त्यांना ट्रोल केले जाते. त्यांनी अनेक वेळा मुलाखतींमध्ये मुल न करण्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. तरीही त्यांना मुलांवरून ट्रोलिंग केले जाते. मात्र आता प्रिया बापटने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

प्रिया एका मिडिया मुलाखतीत बोलली की, "आमच्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत तरी आम्हाला मुलं नाहीत. पण हा आमचा निर्णय आहे. उद्या मला वयाच्या ४२ व्या वर्षी मुलं जन्माला घालायची असतील तर मी ते ही करेन आणि तेव्हाही असे काही वाटलं नाही तर मुलं जन्माला नाही घालणार. पण हे सतत प्रश्न विचारणे थांबवा. अनेक लोकांना वाटते की या जोडप्याचे मुलं पाहायचे मात्र मुल होण्याच इच्छा त्या जोडप्याची नाही ना. "

पुढे प्रिया म्हणाली की, "लग्न झालं की जोडप्याने मुलं जन्माला घालणे हा नियम मला पटत नाही. पूर्वी मला या प्रश्नांचा राग येत असे मात्र आता काही वाटत नाही. कारण मला माहित आहे की,लोकांची मानसिकता आणि त्यांचे आमच्यावरचे प्रेम. मात्र मुलं जन्माला घालायचं की नाही हा सर्वस्वी माझा आणि उमेशचा प्रश्न आहे. "

मुलं नसले तरी प्रिया आणि उमेश नेहमी आनंदी पाहायला मिळतात. मनोरंजन सृष्टीत छान काम करताना पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT